Watch Video : भांग पिलेल्या शेल्पी शेट्टीचा ‘नागीण’ डान्स तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 15:35 IST2017-03-18T10:00:32+5:302017-03-18T15:35:48+5:30

​बॉलिवूड सिनेमांमधून गायब असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या एका व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धूम उडवून दिली आहे.

Watch Video: Do ​​you see Sheppy Shetty's 'herpes' dance as shewed? | Watch Video : भांग पिलेल्या शेल्पी शेट्टीचा ‘नागीण’ डान्स तुम्ही पाहिला का?

Watch Video : भांग पिलेल्या शेल्पी शेट्टीचा ‘नागीण’ डान्स तुम्ही पाहिला का?

लिवूड सिनेमांमधून गायब असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या एका व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धूम उडवून दिली आहे. होळीच्या दिवशीचा असलेल्या या व्हिडीओमध्ये शिल्पा भांग पिऊन नागीण डान्स करताना बघावयास मिळत आहे. शिल्पाचा हा व्हिडीओ तिचा पती राज कुंद्रा यानेच इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, त्यामध्ये शिल्पावर भांगचा नशा चांगलाच चढलेला असल्याचे दिसत आहे. 
 

यावेळी राज कुंद्रा याने काही फोटोही शेअर केले असून, त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘भांगच्या दोन घोट पिल्याचा परिणाम! हा हा हा..! व्हिडीओमध्ये शिल्पा मैत्रीण रोहिणी अय्यर हिच्यासोबत नागीण डान्स करीत आहे. शिल्पाने मित्र आणि परिवारासमवेत खंडाळा येथे होळी सेलिब्रेट केली. यावेळी तिची बहीण शमिता शेट्टीदेखील उपस्थित होती. 



शिल्पा आणि राज नोव्हेंबर २००९ मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. दोघांना वियान नावाचा मुलगा आहे. शिल्पाचा अखेरचा सिनेमा २००७ साली रिलीज झाला होता. या सिनेमात धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते. शिल्पाने २०१४ मध्ये ‘डिश्कयाऊं’ या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 



२००७ मध्ये ब्रिटिश रिअ‍ॅलिटी शो ‘बिग ब्रदर-५’ जिंकल्यानंतर शिल्पा ग्लोबल फिगर बनली होती. या शोमध्ये शिल्पाला कटू अनुभवाचा सामना करावा लागला होता. पुढे २००८ मध्ये शिल्पाने याच शोचे भारतीय संस्करण असलेल्या ‘बिग बॉस’च्या दुसºया सिजनचे होस्ट म्हणून काम बघितले होते. पुढे शिल्पा अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत बघावयास मिळाली. त्याचबरोबर सोशल मीडियावरील तिचे फिटनेस फंडेही चांगलेच गाजले. अशात तिचा समोर आलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धूम उडवित असून, त्यामध्ये शिल्पाचा अवतार बघण्यासारखा आहे.  

Web Title: Watch Video: Do ​​you see Sheppy Shetty's 'herpes' dance as shewed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.