Watch Video : तुम्ही राष्ट्रगीताचे स्पेशल व्हर्जन ऐकले काय? नसेल तर ऐका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2017 11:26 AM2017-08-12T11:26:54+5:302017-08-12T16:56:54+5:30

​आतापर्यंत आपण आपले राष्ट्रगीत अनेक रूपात अन् बºयाचशा कलाकारांसमवेत ऐकले आहे. परंतु यावेळेसचे राष्ट्रगीत खूपच वेगळे आणि अनोखे आहे.

Watch Video: Did you hear the National Anthem Special Edition? If not, listen! | Watch Video : तुम्ही राष्ट्रगीताचे स्पेशल व्हर्जन ऐकले काय? नसेल तर ऐका!

Watch Video : तुम्ही राष्ट्रगीताचे स्पेशल व्हर्जन ऐकले काय? नसेल तर ऐका!

googlenewsNext
ापर्यंत आपण आपले राष्ट्रगीत अनेक रूपात अन् बºयाचशा कलाकारांसमवेत ऐकले आहे. परंतु यावेळेसचे राष्ट्रगीत खूपच वेगळे आणि अनोखे आहे. होय, राष्ट्रगीताचे स्पेशल व्हर्जन खूपच खास आहे. कारण राष्ट्रगीतात महानायक अमिताभ बच्चन दिसत आहेतच, शिवाय त्यांच्यासोबत असलेल्या मुलांना पाहून तुमच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. अमिताभ यांच्यासोबत दिसत असलेले ही मुले दिव्यांग आणि विकलांग आहेत. अमिताभसह ही मुले साइन लॅँग्वेजमध्ये राष्ट्रगीत म्हणत आहेत. हा व्हिडीओ केवळ ऐकतानाच नव्हे तर बघतानाही अंगावर शहारे उभे राहतात. 

काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी राष्ट्रगीताचा हा व्हिडीओ लॉन्च केला आहे. या लॉन्च सोहळ्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता सुदेश वर्मा उपस्थित होते. देशभरात या व्हिडीओचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी गोवा, भोपाळ, चंदीगढ आणि कोल्हापूरमध्ये प्रेक्षकांसमोर एकाच वेळी हा व्हिडीओ लॉन्च करण्यात आला. हा व्हिडीओ बारकाईने बघितल्यास व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये दिल्ली येथील लाल किल्ला दिसत आहे. अमिताभ बच्चन मुलांसोबत राष्ट्रगीत सादर करीत आहेत. परंतु तेदेखील साइन लॅँग्वेजमध्येच राष्ट्रगीत सादर करीत आहेत. 



यामुळेच हा व्हिडीओ आतापर्यंतच्या राष्ट्रगीत व्हिडीओपेक्षा वेगळा ठरतो. तीन मिनिटांचा हा व्हिडीओ ‘अर्धसत्य’ आणि ‘आक्रोश’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केलेल्या गोविंद निहलानी यांनी दिग्दर्शित केला आहे. हा व्हिडीओ बघताना भारताचे माहात्म्य आणि सामर्थ अधोरेखित होते. दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन सध्या आदित्य चोपडाच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ आणि ‘१०२ नॉट आउट’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. 

त्याचबरोबर अमिताभ लवकरच छोट्या पडद्यावरील अतिशय प्रसिद्ध असलेल्या ‘केबीसी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. केबीसीचे काही प्रोमो रिलीज करण्यात आले असून, त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात केबीसीचा हा नववा सीजन आहे. या शोमुळे अमिताभ गेल्या काही दिवसांपासून खूपच उत्साहित दिसत आहेत. 

Web Title: Watch Video: Did you hear the National Anthem Special Edition? If not, listen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.