Watch Video : देवसेनेला बाहुबली वाटतो सेक्सी, तर भल्लालदेव वाटतो...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 19:20 IST2017-05-17T13:49:43+5:302017-05-17T19:20:36+5:30

एका मुलाखतीदरम्यान जेव्हा अनुष्काला ‘प्रभास आणि राणा दग्गुबात्ती यांच्यापैकी सर्वाधिक सेक्सी कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने क्षणाचाही विचार न करता प्रभास सर्वाधिक सेक्सी असल्याचे म्हटले.

Watch Video: Devsena Bahubali looks sexy, while Bhallaldev looks ...? | Watch Video : देवसेनेला बाहुबली वाटतो सेक्सी, तर भल्लालदेव वाटतो...?

Watch Video : देवसेनेला बाहुबली वाटतो सेक्सी, तर भल्लालदेव वाटतो...?

ाहुबली-२’ या चित्रपटात देवसेना अन् बाहुबली यांची लव्हस्टोरी अन् पुढे वैवाहिक जीवन अतिशय सुंदर पद्धतीने दाखविण्यात आले आहे. आता या दोघांनी म्हणजेच अनुष्का शेट्टी अन् प्रभासने रिअल लाइफमध्येही एकमेकांशी विवाह करावा, अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. कारण या दोघांची जोडी खूपच छान दिसत असल्याने त्यांनी आयुष्यभर एकत्र राहावे असाच काहीसा सूर व्यक्त केला जात आहे. पण ही नुसतीच चाहत्यांचीच अपेक्षा नाही तर, अनुष्काच्या मनातही असेच काहीसे चित्र आहे. जेव्हा तिला प्रभासविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने दिलेले उत्तर थक्क करणारे होते. 

एका मुलाखतीदरम्यान जेव्हा अनुष्काला ‘प्रभास आणि राणा दग्गुबात्ती यांच्यापैकी सर्वाधिक सेक्सी कोण?’ असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने क्षणाचाही विचार न करता प्रभास सर्वाधिक सेक्सी असल्याचे म्हटले. तर राणाविषयी तिने दिलेले उत्तर अनेकांच्या भुवया उंचविणारे ठरले. तिने राणाला ब्रो असे म्हटले. अनुष्काने म्हटले की, राणा तिला ब्रदर असे म्हणतो. अन् मी देखील राणाला ब्रदर म्हणूनच बोलावते. आता अनुष्काचे हे उत्तर ऐकून तिच्या मनात प्रभासविषयी नक्कीच फिलिंग असेल यात शंका नाही. 
 

परंतु जर प्रभासचा विचार केला तर त्याने आतापर्यंत सहा हजारांपेक्षा अधिक मुलींचे संबंध नाकारले आहेत. अशात त्याच्या मनात अनुष्काप्रती कितपत प्रेम असेल हे सांगणे मुश्कीलच म्हणावे लागेल. पण काहीही असो अनुष्काने प्रभासप्रती व्यक्त केलेली भावना बरंच काही सांगून जाणारी असून, त्यांच्या फॅन्समध्ये आशेचा किरण निर्माण करणारी आहे. कारण या दोघांनी रिल लाइफबरोबरच रिअल लाइफमध्येही एकत्र यावे अशीच त्यांच्या फॅन्सची इच्छा आहे. 

सध्या प्रभास ‘बाहुबली-२’च्या प्रचंड यशामुळे खूश असून, सध्या तो अमेरिकेत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. प्रभासची ही अमेरिका टूर एवढी गुपित आहे की, त्याचा एकही फोटो अद्यापपर्यंत समोर आलेला नाही; मात्र फोटो समोर येताच तो ‘सीएनएक्स मस्ती’च्या वाचकांपर्यंत पोहोचविला जाईल यातही काही शंका नाही. 

Web Title: Watch Video: Devsena Bahubali looks sexy, while Bhallaldev looks ...?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.