watch : ​‘टायगर जिंदा है’मधील सलमान खानचा पहिला अ‍ॅक्शन सीन; खास तुमच्यासाठी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 14:02 IST2017-03-23T07:55:26+5:302017-03-23T14:02:48+5:30

सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा आॅनस्क्रीन रोमान्स पाहायला प्रेक्षक तसेही उत्सूक आहे. आता तर सोबत सलमानचे एकापेक्षा एक ...

watch: Salman Khan's first action scene in 'Tiger Zinda Hai'; Specially for you !! | watch : ​‘टायगर जिंदा है’मधील सलमान खानचा पहिला अ‍ॅक्शन सीन; खास तुमच्यासाठी!!

watch : ​‘टायगर जिंदा है’मधील सलमान खानचा पहिला अ‍ॅक्शन सीन; खास तुमच्यासाठी!!

मान खान आणि कॅटरिना कैफ यांचा आॅनस्क्रीन रोमान्स पाहायला प्रेक्षक तसेही उत्सूक आहे. आता तर सोबत सलमानचे एकापेक्षा एक दमदार अ‍ॅक्शन सीन्सही पाहायला मिळणार आहेत. होय, आम्ही बोलताये ते, ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाविषयी. काल ‘टायगर जिंदा है’चा एक फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो होता, या चित्रपटातील कॅटरिना व सलमान यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या एका रोमॅन्टिक गाण्यातील दृश्याचा. आज या चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ आहे, सलमानच्या धमाकेदार अ‍ॅक्शन सीन्सचा. या व्हिडिओसोबतच जफर यांनी एक घोषणाही केली आहे. ही घोषणा आहे, अ‍ॅक्शन सीन्सच्या सीक्वेन्स शूटची.  ‘टायगर जिंदा है’च्या अ‍ॅक्शन सीन्सचे शूटींग सुरू झाले आहे, असे त्यांनी जाहिर केले आहे. सध्या आॅस्ट्रियात या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. आता पुढची बातमी वाचण्याआधी तुम्ही जफर यांनी पोस्ट केलेला हा थरारक व्हिडिओ पाहायलाच हवा. शिवाय यातील सलमानचा तुफानी अंदाज कसा वाटला, हेही आम्हाला कळवायला हवे.
 


ALSO READ : मी कधीच ऐश्वर्याला मारहाण केली नाही; हे आत्ता का सांगतोय सलमान खान ?
‘टायगर जिंदा है’ हा २०१२ मध्ये आलेल्या सुपरहिट ‘एक था टायगर’ या सिनेमाचा   सीक्वल  आहे. पहिल्या भागाचे कबीर खान यांनी दिग्दर्शन केले होते, तर दुसºया भागात अली अब्बास जफर दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.  या सिनेमासाठी सलमानने त्याचे तब्बल २० किलो वजन कमी केले आहे. पहिल्या भागात सलमानने एजंटची भूमिका साकारली होती. सलमानबरोबरच कॅटरिनानेही सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन केली होती.  

Web Title: watch: Salman Khan's first action scene in 'Tiger Zinda Hai'; Specially for you !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.