WATCH जग्गा जासूस ट्रेलर : रणबीर कपूरचा हा सर्वोत्तम चित्रपट ठरेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2016 13:44 IST2016-12-20T12:38:56+5:302016-12-20T13:44:57+5:30

रणबीर-कॅट स्टारर ‘जग्गा जासूस’चे पहिले ट्रेलर इंटरनेटवर रिलीज करण्यात आले. ट्रेलरवरून तरी हा चित्रपट रणबीरचा करिअर बेस्ट परफॉर्मन्स ठरेल असे दिसतेय.

WATCH Jagga spy trailer: Will Ranbir Kapoor be the best movie? | WATCH जग्गा जासूस ट्रेलर : रणबीर कपूरचा हा सर्वोत्तम चित्रपट ठरेल का?

WATCH जग्गा जासूस ट्रेलर : रणबीर कपूरचा हा सर्वोत्तम चित्रपट ठरेल का?

न वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. रणबीर कपूर-कॅटरिना कैफ स्टारर ‘जग्गा जासूस’चा ट्रेलर इंटरनेटवर दाखल झाला आहे. ट्रेलरचे वर्णन करायचे तर केवळ एवढाच विचार मनात येतो की, हा चित्रपट रणबीर कपूरचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरेल का?

२.४४ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रणबीर-कॅट जगात शक्य असतील तेवढ्या अडचणींचा सामना करताना दिसतात. चित्त्यापासून ते गोळीबार ते हवाईहल्ला असे सर्व धोके  त्यांच्या समोर येतात. केवळ बॅकग्राउंड स्कोरच्या पार्श्वभूमीवर या सर्व घटना दाखवल्या जातात.

या चित्रपटात रणबीर ‘जासूस’ अर्थातच गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. लहानपणीच त्याचे वडील त्याला सोडून गेल्याचे ट्रेलरमध्ये दिसते. बहुधा आपल्या वडिलांचा शोध हा ‘जग्गा जासूस’ घेत असावा. ट्रेलरपाहून ‘बर्फी’ चित्रपटाची आपसुकच आठवण येते. ‘बर्फी’प्रमाणेच यामध्येसुद्धा अनेक छोटे-छोटे विनोदी प्रसंग आहेत.

                                   

ट्रेलरवरून तरी हा सिनेमा म्युझिकल कॉमेडी असणार असे दिसतेय. शेवटी रणबीर (एक्स गर्लफ्रेंड) कॅटरिनाला किस करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. पण कॅट डोळे उघडताच तो तिच्या ओठांवर बोट ठेवून स्वत:च्या ओठांना लावतो आणि ट्रेलरमधील एकमेव डायलॉग म्हणतो, ‘ओठ फट गये थे मेरे’.

एवढ्या वर्षांच्या प्रतीक्षेचे योग्य फळ मिळाले असे म्हणावे लागेल. रणबीर-कॅटची केमिस्ट्री खरोखरंच खूप छान आहे. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. ‘ए दिल है मुश्किल’चा गंभीर अंदाज पाहिल्यानंतर ‘जग्गा जासूस’मध्ये रणबीरचे मिश्कील रुप पाहायला तयार व्हा.

Jagga Jasoos Screenshot ranbir

Jagga Jasoos Screenshot Katrina

cnxoldfiles/a> त्यामध्ये रणबीर-कॅट शहामृगावर बसलेले दिसतात. ते शहामृगावर काय कराहेत याचे उत्तर हे ट्रेलर पाहून मिळते. अदा शर्मादेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. गोविंदा आणि शाहरुख खान हे पाहुण्या कलाकार म्हणून सिनेमात दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: WATCH Jagga spy trailer: Will Ranbir Kapoor be the best movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.