WATCH : जबरदस्त सस्पेन्स अन् थ्रील! ‘इत्तेफाक’चा ट्रेलर आला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 12:37 IST2017-10-05T07:07:04+5:302017-10-05T12:37:04+5:30
अखेर यंदाच्या बहुप्रतिक्षीत क्राईम थ्रीलर रिमेकचा ट्रेलर रिलीज झाला. होय, आम्ही बोलतोय ते ‘इत्तेफाक’बद्दल. सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना स्टारर ‘इत्तेफाक’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला.
.jpg)
WATCH : जबरदस्त सस्पेन्स अन् थ्रील! ‘इत्तेफाक’चा ट्रेलर आला!
अ ेर यंदाच्या बहुप्रतिक्षीत क्राईम थ्रीलर रिमेकचा ट्रेलर रिलीज झाला. आम्ही कुठल्या रिमेकबद्दल बोलतोय, हे तुम्हाला कळले असेलच. होय, आम्ही बोलतोय ते ‘इत्तेफाक’बद्दल. सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना स्टारर ‘इत्तेफाक’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला.
येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होणा-या या चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त आहे. फुल सन्स्पेन्स आणि फुल थ्रील शिवाय सिद्धार्थ व सोनाक्षीचा एकदम नवा अवतार हे सगळे बघणे इंटरेस्टिंग आहे. हा चित्रपट १९६९ मध्ये आलेल्या राजेश खन्ना यांच्या ‘इत्तेफाक’चा आॅफिशिअल रिमेक आहे. राजेश खन्ना व नंदा यांनी यात मुख्य भूमिका साकारली होती. रिमेकमध्ये मात्र ही जागा सिद्धार्थ मल्होत्रा व सोनाक्षी सिन्हा या दोघांनी घेतलीय. अभय चोप्रा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. आधी या रिमेकचे नाव ‘इट हॅपन्ड वन नाईट’ असे होते. पण नंतर या चित्रपटाला ‘इत्तेफाक’ हेच नाव देण्याचे ठरले.
ALSO READ : #Ittefaq Poster out : सिद्धार्थ मल्होत्रा वा सोनाक्षी सिन्हा? ‘इत्तेफाक’चा दोषी कोण?
शाहरूख खान आणि करण जोहर या चित्रपटाला प्रोड्यूस करत आहेत. चित्रपटात अक्षय खन्ना पोलिस अधिकाºयाच्या भूमिकेत एक डबल मर्डर मिस्ट्री सोडवताना दिसणार आहे. सिद्धार्थ या चित्रपटात विक्रमची भूमिका साकारतोय तर सोनाक्षी माया नामक व्यक्तिरेखेत दिसणार आहे. दोघांवरही आपआपल्या पार्टनरच्या हत्येचा आरोप आहे आणि हा आरोप व या प्रकरणाच्या चौकशीवर हा चित्रपट बेतलेला आहे. ट्रेलरमध्ये अक्षयचा एक ‘सुपरहिट’ डायलॉग आहे. ‘तुम्हारे जैसे भुट्टे रोज सेंकते है हम,’असा हा डायलॉग आहे. चित्रपटात अशाच अनेक ‘सुपरहिट’ डायलॉगची अपेक्षा केली जात आहे. याशिवाय सिद्धार्थ व सोनाक्षीचा जबरदस्त अभिनयही यात पाहायला मिळू शकतो. यापूर्वी ‘एक विलेन’मधील सिद्धार्थच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. ‘इत्तेफाक’ रिलीज झाल्यानंतर सिद्धार्थचे कौतुक पुन्हा एकदा ऐकायला मिळू शकते. ट्रेलरमधील सोनाक्षीचा अभिनयही जबरदस्त आहे. ‘इत्तेफाक’ हा रिमेक असला तरी त्याच्या कथेत बरेच बदल केल्या गेल्याचे म्हटले जातेय. यश चोप्रा यांच्या चित्रपटात एकही गाणे नव्हते. पण याच्या रिमेकच्या बॅकग्राऊंडमध्ये मात्र गाणी ऐकायला मिळणार आहेत.