VIDEO : अजय किसको बुला रहे हो? मेरा नाम सुदर्शन है...; अजय देवगणने बदलले नाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:15 AM2021-03-25T11:15:24+5:302021-03-25T11:17:13+5:30

आता अजय देवगणला अजय नाही तर सुदर्शन म्हणायचे. होय, हा आमचा नाही तर खुद्द अजयचा आग्रह आहे.

watch ajay devgn changed his name to sudarshan supposedly for a new project with disney plus hotstar |  VIDEO : अजय किसको बुला रहे हो? मेरा नाम सुदर्शन है...; अजय देवगणने बदलले नाव?

 VIDEO : अजय किसको बुला रहे हो? मेरा नाम सुदर्शन है...; अजय देवगणने बदलले नाव?

googlenewsNext
ठळक मुद्देलवकरच डिज्नी हॉटस्टारवर अजयचा ‘द बिग बुल’ हा सिनेमा रिलीज होतोय. अजय या सिनेमाचा निर्माता आहे.

आता अजय देवगणला अजय नाही तर सुदर्शन म्हणायचे. होय, हा आमचा नाही तर खुद्द अजयचा आग्रह आहे. होय, अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक मजेदार व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. मला अजय म्हणू नका तर सुदर्शन म्हणा, असे अजय यात म्हणतोय.
 दुआ में याद रखना, नाम है सुदर्शन..., असे कॅप्शन अजयने हा व्हिडीओ पोस्ट करताना दिले आहे. ‘आपसे कितनी बार बोला है... अजय किसको बुला रहे हो? मेरा नाम सुदर्शन है... सुदर्शन...,’ असे अजय व्हिडीओत म्हणतोय.

आता अजयने अचानक नाव का बदलावे, हे कोडे आहे. पण होय, आपल्या या व्हिडीओसोबत अजयने डिज्नी प्लस हॉटस्टारला टॅग केले आहे. यावरून त्याचा हा व्हिडीओ आणि त्याचे हे सुदर्शन हे नाव ओटीटीवरच्या नव्या प्रोजेक्टचा भाग असावा. असे झालेच तर हा अजयचा डिजिटल डेब्यू असेल.

लवकरच डिज्नी हॉटस्टारवर अजयचा ‘द बिग बुल’ हा सिनेमा रिलीज होतोय. अजय या सिनेमाचा निर्माता आहे. यात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अजयचे एकापाठोपाठ एक असे सिनेमे येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. मैदान, भुज- द प्राईड आॅफ इंडिया याशिवाय मे-डे या सिनेमात अजय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय बाहुबली फेम दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या आरआरआर या सिनेमातही अजयची वर्णी लागली आहे. इतकेच नाही तर अलिया भटसोबत ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘मे-डे’ या सिनेमाद्वारे अजय पुन्हा एकदा दिग्दर्शनात हात आजमावतोय. यात अजय मुख्य भूमिकेत असेल तर त्याच्यासोबत अमिताभ बच्चन व रकूल प्रीत सिंग झळकतील.

Web Title: watch ajay devgn changed his name to sudarshan supposedly for a new project with disney plus hotstar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.