वाणी कपूर म्हणतेय,‘मी सिंगल ; मात्र कुणाच्यातरी शोधात’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:48 IST2016-12-20T16:57:40+5:302016-12-21T16:48:30+5:30

सेलिब्रिटी असले तरीही त्यांना वैयक्तिक आयुष्य हे असतंच ना! एक जोडीदार शोधून त्याच्यासोबत आयुष्याला अर्थ प्राप्त करून देण्याचा त्यांचाही ...

Wani Kapoor says, 'I am single; But in search of somebody, | वाणी कपूर म्हणतेय,‘मी सिंगल ; मात्र कुणाच्यातरी शोधात’

वाणी कपूर म्हणतेय,‘मी सिंगल ; मात्र कुणाच्यातरी शोधात’

लिब्रिटी असले तरीही त्यांना वैयक्तिक आयुष्य हे असतंच ना! एक जोडीदार शोधून त्याच्यासोबत आयुष्याला अर्थ प्राप्त करून देण्याचा त्यांचाही प्रयत्न असतो. असाच काहीसा विचार सध्या वाणी कपूर करताना दिसतेय.  तिला ‘सिंगल’ राहण्याचा कंटाळा आलाय म्हणे. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘बेफिक्रे’ चित्रपटात तिने साकारलेली ‘शीरा’ची भूमिका तिला बोल्ड वाटते. शीरावर वेड्यासारखा प्रेम करणारा धरम तिच्यासोबत असतो. तिच्या वैयक्तिक आयुष्यातही असं कोणीतरी असावं जो तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करेल. अशा व्यक्तीच्या शोधात ती सध्या असल्याचे सांगतेय. 



रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिकेतील ‘बेफिक्रे’ चित्रपट सध्या बॉक्स आॅफिसवर धूम करतोय. यातील ‘धरम-शीरा’ या जोडीचे बिनधास्त कथानक, आयुष्याकडे बघण्याचा ‘क्रेझी’ दृष्टिकोन, मित्र म्हणत नकळत एकमेकांवर प्रेम करण्याची कला हे सर्व तरूणाईला भुरळ घालतेय. वाणीने यात केलेली ‘शीरा’ची भूमिका तिला एवढी आवडली की, ‘ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातही तिच्याप्रमाणेच वागू इच्छिते. ती म्हणते,‘मी आज सिंगल आहे. पण, माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या  व्यक्तीच्या मी शोधात आहे. आमच्या दोघांत विश्वास आणि त्यागाची भावना असायला हवी. माझ्याबद्दलच त्याने क्रेझी असावं अशीही अपेक्षा मी त्याच्याकडून ठेवते. कारण, त्यामुळेच मी त्याच्याविषयी तेवढीच क्रेझी होऊ शकेन. मी माझ्याकडून नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न करतेय तर मी त्याच्याकडूनही अपेक्षा नक्कीच ठेवणार ना!’



‘शुद्ध देसी रोमांस’ चित्रपटाच्या माध्यमातून वाणी कपूरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. त्यात तिची सुशांतसिंग राजपूतसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांना लक्षात राहिली. पण, तिचा ‘बेफिक्रे’ तील बोल्ड अ‍ॅण्ड हॉट अंदाज चाहत्यांना आश्चर्य व्यक्त करायला लावणारा नक्कीच होता. रणवीर सिंग सोबतची तिची केमिस्ट्री कौतुकास्पद आहेच पण, आदित्य चोप्राने तिला या चित्रपटासाठी निवडले यातच तिचे खरे कौतुक मानले पाहिजे.

Web Title: Wani Kapoor says, 'I am single; But in search of somebody,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.