​ ‘सरकार3’ची प्रतीक्षा लांबली; रिलीज डेट पुढे ढकलली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 09:31 IST2017-03-22T04:01:40+5:302017-03-22T09:31:40+5:30

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सरकार3’ची प्रतीक्षा लांबली आहे. होय, आधी हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला रिलीज होणार ...

Waiting for 'Government 3'; Release date postponed! | ​ ‘सरकार3’ची प्रतीक्षा लांबली; रिलीज डेट पुढे ढकलली!

​ ‘सरकार3’ची प्रतीक्षा लांबली; रिलीज डेट पुढे ढकलली!

िताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘सरकार3’ची प्रतीक्षा लांबली आहे. होय, आधी हा चित्रपट येत्या ७ एप्रिलला रिलीज होणार होता. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकण्यात आली आहे. आता ‘सरकार3’ येत्या १२ मे रोजी रिलीज होईल. सोशल मीडियावर याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे,रिलीज डेट बदल्याने या चित्रपटाचा बॉक्सआॅफिसवर आयुष्यमान खुराणा आणि परिणीती चोप्रा यांच्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या सिनेमाशी संघर्ष अटळ मानला जात आहे.

पोस्ट प्रॉडक्शनचे काम रखडल्याने या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलावी लागली आहे. भारतीय राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या ‘सरकार3’मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशिवाय जॅकी श्रॉफ, मनोज वाजपेयी आणि यामी गौतम यांची भूमिका आहे.

ALSO READ : ​तुम्हाला ठाऊक आहे का ‘सरकार3’ अन् ‘सेक्स सीन’चा संबंध?

रिलीजच्या काही दिवसांआधी ‘सरकार3’ एका वादातही अडकला आहे. हा वाद म्हणजे, कॉपीराईट उल्लंघनाचा. स्क्रिप्ट राईटर नीलेश गिरकार यांनी ‘सरकार3’च्या मेकर्सवर कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. ‘सरकार3’ची पटकथा मी लिहिलिय.  पटकथा लिहिण्यापूर्वी राम गोपाल वर्मा यांनी मला मोठ-मोठी आश्वासने दिली होती. मात्र नंतर कथा लेखनाचे श्रेयच नव्हे, तर योग्य मोबदलाही मला दिला गेला नाही, असा आरोप नीलेश यांनी केला आहे. नीलेश यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने ११ मार्चला  राम गोपाल वर्मांना ६ लाख २० हजार रुपयांची सेटलमेंट रक्कम देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १७ मार्चला करण्यात आलेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने नीलेश यांच्यासाठी खास स्क्रिनिंग ठेवण्याचे आदेश  दिले आहेत. चित्रपट पाहिल्यानंतर नीलेश यांना त्यांनी लिहिलेल्या स्क्रिप्टचा किती प्रमाणात चित्रपटामध्ये वापर करण्यात आला आहे, ते समजण्यासाठी न्यायालयाने हा आदेश दिला आहे. 

Web Title: Waiting for 'Government 3'; Release date postponed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.