विवान शाह म्हणतो, बॉलिवूडमध्ये काम मिळविताना कुटुंबाच्या नावाचा वापर नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 18:27 IST2017-03-14T12:57:38+5:302017-03-14T18:27:38+5:30

वडील अभिनेते नसिरूद्दीन शाह आणि आई अभिनेत्री रत्ना पाठक यांच्या नावाचा वापर न करता बॉलिवूडमध्ये काम मिळविण्यात यशस्वी झाल्याचे ...

Vivaan Shah says, the use of family name is not used in Bollywood! | विवान शाह म्हणतो, बॉलिवूडमध्ये काम मिळविताना कुटुंबाच्या नावाचा वापर नाही!

विवान शाह म्हणतो, बॉलिवूडमध्ये काम मिळविताना कुटुंबाच्या नावाचा वापर नाही!

ील अभिनेते नसिरूद्दीन शाह आणि आई अभिनेत्री रत्ना पाठक यांच्या नावाचा वापर न करता बॉलिवूडमध्ये काम मिळविण्यात यशस्वी झाल्याचे अभिनेता विवान शाह याने सांगितले. 
विवान म्हणतो, ‘मी माझ्या स्वत:च्या पायावर उभा आहे. माझ्या कुटुंबाच्या नावाचा वापर मी करीत नाही. मी जर बाहेरचा असेन, तर मला काम मिळविणे अधिक कठीण होते. चित्रपट उद्योगालाही माझ्याविषयी फारशी माहिती नाही.
विशाल भारद्वाजच्या सात खून माफ द्वारे विवानने आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. त्यानंतर त्याने शाहरूख खानच्या हॅपी न्यू इअर आणि अनुराग कश्यपच्या बॉम्बे वेल्वेटमध्ये काम मिळविले. 
विवान सध्या लाली की शादी में लड्डू दिवाना या चित्रपटात काम करतो आहे. या उद्योगाचा एक भाग बनावयाचा असेल तर मला सत्य ते ओळखता आले पाहिजे. या उद्योगात असे अनेक जण आहेत, जे काम करू इच्छितात, परंतू कोणत्याही संबंधामुळे त्यांना काम मिळत नाही. मी इथे जन्मलो म्हणून लोक मला ओळखतात, असेही त्याने सांगितले.


नसिरुद्दीन शाह यांना कलात्मक चित्रपटासाठी अधिक ओळखले जाते. विवान हा व्यावसायिक चित्रपटांमध्ये काम करतो आहे. स्वतंत्र भूमिकेत काम करावेसे वाटत नाही का? यावर बोलताना त्याने सांगितले, ‘तसं काही नाही. अभिनेता म्हणून चित्रपट तुम्हाला स्वीकारतो, तुम्ही चित्रपटाला नाही.’
आपल्या कामाची समीक्षा तो आपल्या पालकांकडून करतो. ‘त्यांना आतापर्यंतच्या माझ्या तिन्ही भूमिका आवडल्या आहेत, त्यांनी आपले स्पष्ट मतही कळविले आहे, असे त्याने सांगितले. लाली की शादी में लड्डू दिवाना या चित्रपटात अक्षरा हसन आणि गुरमित चौधरी यांच्याही भूमिका आहेत. मनीष हरिशंकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल.



Web Title: Vivaan Shah says, the use of family name is not used in Bollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.