विराट कोहलीने दिला स्माईल फौंडेशनला हाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 15:51 IST2016-05-04T10:19:49+5:302016-05-04T15:51:31+5:30
विराट कोहली फौंडेशनने स्माईल फौंडेशन या राष्टÑीय स्तरावरील संघटनेसोबत वंचित मुले आणि युवकांच्या सशक्तीकरणासाठी मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला ...
.jpg)
विराट कोहलीने दिला स्माईल फौंडेशनला हाथ
व राट कोहली फौंडेशनने स्माईल फौंडेशन या राष्टÑीय स्तरावरील संघटनेसोबत वंचित मुले आणि युवकांच्या सशक्तीकरणासाठी मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच कार्यक्रमांतर्गत जून महिन्यात मुंबईमध्ये चॅरिटी डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली स्वत: आयोजक आहे. यावेळी अनेक क्रिकेटपटू, उद्योजक, कार्पोरेट क्षेत्रातील मान्यवरांना बोलाविण्यात येईल. पंचतारांकित शेफ विकास खन्ना हे सुमारे २०० आमंत्रितांसाठी भोजन तयार करणार आहेत. याच कार्यक्रमात अनेक अलिशान वस्तूंचा लिलाव होणार आहे. मनोरंजनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे.
यासंदर्भात बोलताना विराट म्हणाला, ‘मुले आणि युवक हे, येत्या काळातील विद्यार्थी, नेते, उद्योजक आणि देशाचे भवितव्य आहेत. त्यांच्या सशक्तीकरणासाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठीच नव्हे तर स्वत:ची काळजी घेण्याइपत त्यांना उभे करणे, शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देणे, आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांना तयार करणे आणि भविष्यातील नेते म्हणून त्यांना पुढे आणणे हा आमचा उद्देश आहे. स्माईल फौंडेशनने याकामी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याबद्दल मला आनंद वाटतो.’
पंचतारांकित शेफ विकास खन्ना हे स्माईल फौंडेशनचे ग्लोबल अॅम्बेसेडर आहेत. याच कार्यक्रमात विकास खन्ना यांच्या ‘उत्सव: अ कलिनरी इपिक आॅफ इंडियन फेस्टीव्हल’ याच्या १२ व्या आवृत्तीचा लिलाव होणार आहे. शिक्षणासाठी पोषण या कार्यात ते सल्ला देतात. विकास खन्ना यांच्या अनुसार ‘योग्य पोषण आहार युवा पिढीसाठी महत्वाची बाब आहे. सशक्त भारताच्या उभारणीसाठी हे आवश्यक आहे. आहाराअभावी कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी स्माईल फौंडेशनसोबत मी काम करतो आहे.
विराट कोहली हा सध्या भारतामधील युवकांची प्रेरणा आहे. भारतीय युवकांची आशा, महत्वाकांक्षा आणि लाखो स्वप्ने त्याच्याशी जोडली गेली आहेत. विराट कोहली फौंडेशनच्या सामाजिक कामाचे आम्ही कौतुक करतो. त्यामुळे मुले आणि युवकांच्या सशक्तीकरणासाठी आम्ही या संघटनेसोबत काम करण्याचे ठरविले असल्याचे स्माईल फौंडेशनचे सहसंस्थापक आणि कार्यकारी विश्वस्त शंतनू मिश्रा यांनी साांगितले.
स्माईल फौंडेशन मुलांच्या आणि युवकांसाठी काम करते. त्यांना शिक्षण, प्रशिक्षण कौशल्ये, योग्य आहार आणि संधी उपलब्ध करुन देण्यासाठी काम करते. याचा आतापर्यंत चार लाख मुलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना फायदा झाला आहे.