विराट कोहलीला अजिबात आवडत नाही, गर्लफ्रेन्ड अनुष्का शर्माची ‘ही’ सवय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 15:20 IST2017-10-04T09:50:50+5:302017-10-04T15:20:50+5:30
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील प्रेमाचे संबंध आता कुणापासूनही लपून राहिलेले नाहीत. दोघांचेही एकमेकांवर ...

विराट कोहलीला अजिबात आवडत नाही, गर्लफ्रेन्ड अनुष्का शर्माची ‘ही’ सवय!
ट म इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यातील प्रेमाचे संबंध आता कुणापासूनही लपून राहिलेले नाहीत. दोघांचेही एकमेकांवर प्रेम असल्याचे अनेकदा समोर आले आहे. एकमेकांसोबत वेळ घालवणे, पार्टीला एकत्र जाणे यासगळ्यांमुळे विराट व अनुष्काचे नाते जगजाहिर झाले आहे. खरे तर अनुष्का व विराट दोघांनीही आपले नाते कधीच लपवून ठेवले नाही. ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो’ असेच त्यांचे वागणे राहिले आहे. कदाचित म्हणूनच चाहतेही त्यांना ‘विरूष्का’ नावाने ओळखू लागले आहेत.
खरे तर विराट अनुष्कापेक्षा अधिक बिनधास्त आहे. रिलेशनशिपबद्दल लपवाछपवी करण्याचा प्रकार त्याला मुळातच आवडत नाही. म्हणून स्वत:च्या अन् अनुष्काबद्दलची कुठलीच गोष्ट तो लपवत नाही. अलीकडे एका इव्हेंटमध्ये तर अनेकांनी हे प्रत्यक्ष अनुभवले. अनुष्का या इव्हेंटमध्ये हजर नव्हती. पण विराट आणि आमिर खान यानिमित्ताने एकत्र आले होते. या इव्हेंटमध्ये विराटला अनुष्काबद्दल बरेच प्रश्न विचारले गेले. विशेष म्हणजे, विराटने या सगळ्या प्रश्नांना अगदी प्रामाणिक उत्तरे दिलीत. तुला तुझ्या प्रेयसीमधील म्हणजेच अनुष्कामधील कुठला गुण आवडतो आणि कुठला गुण आवडत नाही, असा प्रश्न विराटला विचारण्यात आला. विराटने कुठलेही आढेवेढे न घेता या प्रश्नाचे थेट शब्दांंत उत्तर दिले.
मला तिच्यातील सर्वाधिक आवडणारी गोष्ट म्हणजे, तिचा प्रामाणिकपणा. ती खूपच प्रामाणिक आहे. ती सर्वांचीच काळजी घेते. तिचा हा स्वभाव मला खूप आवडतो. खरे तर मला तिच्या कुठल्याच गोष्टीचा राग येत नाही. पण तिची एक सवय मात्र मला मनापासून आवडत नाही. ती म्हणजे, कुठल्याही ठिकाणी पाच-सात मिनिटे उशीराने पोहोचणे. तिची ही सवय मला खटकते, असे विराटने यावेळी सांगितले. आता विराटच्या या नाराजीनंतर अनुष्का किती बदलते, हे पाहणे नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे.
ALSO READ : विराट कोहली अन् अनुष्का शर्मा यांच्यात चाललेयं तरी काय?
विराट व अनुष्का या दोघांमध्ये २०१३ पासून अफेअर सुरु आहे. २०१५ च्या सुरुवातीला दोघांचेही ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. मात्र यानंतर मार्च २०१६ मध्ये दोघेही एकत्र दिसले आणि यांच्या प्रेमाच्या चर्चा पुन्हा होऊ लागल्या.