करिअर यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने अचानक सोडलं बॉलिवूड, घेतला संन्यास, आश्रमात जाऊन केलं माळी काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 01:38 PM2023-10-06T13:38:58+5:302023-10-06T13:54:59+5:30

विनोद खन्नासमोर चित्रपटांची रांग लागली होती, त्यांना साइन करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात स्पर्धा लागली होती.

Vinod khanna birthday anniversary some unknown facts of actor who became sanyasi at osho rajneesh ashram | करिअर यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने अचानक सोडलं बॉलिवूड, घेतला संन्यास, आश्रमात जाऊन केलं माळी काम

करिअर यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने अचानक सोडलं बॉलिवूड, घेतला संन्यास, आश्रमात जाऊन केलं माळी काम

googlenewsNext

बॉलिवूडच्या मोस्ट हॅण्डसम हिरोंमध्ये विनोद खन्ना यांची गणना केली जात असे. विनोद खन्ना आज आपल्यात नाहीत. पण त्यांची अदाकारी, त्यांचे सिनेमे कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत असतील. आज त्यांचा वाढदिवस. 6 ऑक्टोबर 1946 साली पेशावरमध्ये जन्मलेल्या विनोद खन्नांचे वडील मोठे बिझनेसमॅन होते. पण फाळणी झाली आणि खन्ना कुटुंब भारतात आलं. 

1968 साली विनोद खन्नांचा पहिला सिनेमा ‘मन की मीत’ हा सिनेमा रिलीज झाला आणि यानंतर कमाल झाली. होय, हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर एका आठवड्यातच विनोद खन्ना यांनी एक-दोन नाही तर 15 नवे सिनेमे साईन केले. पण त्यांना खरी दिली ती गुलजार यांच्या ‘अचानक’ या सिनेमाने. यानंतर किमान 1982 सालापर्यंत तरी विनोद खन्नांनी कधीच मागे वळून बघितलं नाही.   

विनोद खन्नासमोर चित्रपटांची रांग लागली होती, त्यांना साइन करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यात स्पर्धा लागली होती. पण सुपरस्टार बनलेल्या विनोद खन्ना यांना शांतता हवी होती. 1982 साली करिअरच्या शिखरावर असताना त्यांनी अचानक चित्रपटसृष्टीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेऊन त्यांनी त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला. सगळं काही सुरळीत सुरु असतानाही विनोद खन्ना यांचे मन संसारात रमत नव्हतं. शेवटी त्यांनी संन्यास घेण्याचं ठरवलं.

संन्यास घेण्याआधी ते तासन् तास ओशो यांचे व्हिडिओ पाहायचे आणि अनेकदा पुण्यातील त्यांच्या आश्रमातही जायचे. विनोद खन्ना ह ओशोने सांगितलेल्या मार्गावर चालायला लागले होते. १९८२ मध्ये ते रजनीश आश्रमात जाऊन संन्यासी झाली. विनोद खन्नांनी ओशोंचे शिष्यत्व पत्करले. आश्रमात गेल्यानंतर  विनोद खन्ना यांनी तिकडे माळी म्हणून काम केले. यासोबतच त्यांनी तेथील स्वच्छतागृहांच्या साफसफाईपासून इतर अनेक कामे केली. 

विनोद खन्ना यांनी १९६८ मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होत. मेरे अपने, मेरा गाव मेरा देश, मुकद्दर का सिंकदर, गद्दार, जेल यात्रा, इम्तिहान, इन्कार, अमर अकबर अँन्थनी, राजपूत, कुरबानी, कुदरत, दयावान, कारनामा, सुर्या, जुर्म या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. पदार्पण करताना त्यांना नायकाची भूमिका मिळाली नाही. सुरुवातीला साहाय्यक अभिनेता, खलनायक अशा भूमिका त्यांनी केल्या. मेरा गाव, मेरा देशमधील त्यांनी खलनायकाची भूमिका विशेष गाजली होती. अचानकमधील भूमिकेसाठी समीक्षकांनी त्यांना दाद दिली.
 

Web Title: Vinod khanna birthday anniversary some unknown facts of actor who became sanyasi at osho rajneesh ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.