​विन डिझेल मुंबईत; विमानतळावर मराठमोळे स्वागत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 17:31 IST2017-01-12T11:10:47+5:302017-01-13T17:31:21+5:30

अखेर हॉलिवूडचा अ‍ॅक्शन सुपरस्टार विन डिझेल भारतात आलाच. या अ‍ॅक्शन स्टारच्या आगमनाकडे  संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष लागले होते. त्याचे भारतीय ...

Vin Diesel in Mumbai; Welcome to the airport at the airport ... | ​विन डिझेल मुंबईत; विमानतळावर मराठमोळे स्वागत...

​विन डिझेल मुंबईत; विमानतळावर मराठमोळे स्वागत...

ेर हॉलिवूडचा अ‍ॅक्शन सुपरस्टार विन डिझेल भारतात आलाच. या अ‍ॅक्शन स्टारच्या आगमनाकडे  संपूर्ण बॉलिवूडचे लक्ष लागले होते. त्याचे भारतीय चाहते सुद्धा त्याच्या आगमनाची प्र्रचंड आतुरतेने प्रतीक्षा करीत होते. अखेर विनचे विमान मुंबई विमानतळावर लँड झाले.  त्याच्यासोबत होती ती बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण. विन  व दीपिका विमानतळावर उतरताच मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे जोरदार स्वागत केले गेले. पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केलेल्या अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने विनचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले.







विनच्या भारत दौ-यासाठी दीपिकानेच खास आयोजन केले असून त्याच्या पाहुणचारामध्ये कोणतीही कसर बाकी ठेवली जाणार नाही यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. विन डिझेल भारतात दोन दिवस थांबणार आहे. त्याच्या या दौºयाची संपूर्ण रुपरेषा निर्धारित असून चाहत्यांच्या भेटीगाठीपासून ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यापर्यंतचे कार्यक्रम आखण्यात आले आहे.



‘एक्सएक्सएक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ या हॉलिवूडपटाच्या प्रमोशनसाठी विन भारतात आला आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. दीपिकासुद्धा या चित्रपटाच्या प्रचारात बिझी आहे. लंडनमध्ये चित्रपटाचा प्रचार केल्यानंतर दीपिका ‘एक्सएक्सएक्स’च्या संपूर्ण टीमसह भारतात परतली. ‘एक्सएक्सएक्स: दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा सर्वप्रथम भारतात रिलीज होणार आहे. येत्या १४ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  अन्य देशांत तो १९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.



 विन व दीपिका यांच्यासह डोनी येन, निना डोबे्रव्ह, रूबी रोज आणि सॅम्युअल एल.जॅक्सन हे हॉलिवूड स्टारही या चित्रपटात झळकणार आहेत. ‘एक्स एक्स एक्स : दी रिटर्न आॅफ जेंडर केज’ हा सन २००२ मध्ये अलेल्या ‘एक्स एक्स एक्स’ आणि २००५ मध्ये आलेल्या ‘एक्स एक्स एक्स : स्टेट आॅफ द युनियन’चा सीक्वल आहे. यापूर्वीच्या दोन्ही हॉलिवूडपटांप्रमाणे यातही धमाकेदार आणि चित्तथरारक अ‍ॅक्शन दृश्यांची भरमार असणार आहे, हे सांगणे नकोच...!  
  

Web Title: Vin Diesel in Mumbai; Welcome to the airport at the airport ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.