विजय मल्ल्याचे बॉलिवूड कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 02:26 IST2016-03-12T09:26:16+5:302016-03-12T02:26:16+5:30

देशाच्या वेगवेगळ्या १७ बॅँकांकडून ९ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज न फेडता  गुपचूप देश सोडून लंडनला गेलेले व्यावसायिक विजय मल्ल्या ...

Vijay Malli Bollywood connection | विजय मल्ल्याचे बॉलिवूड कनेक्शन

विजय मल्ल्याचे बॉलिवूड कनेक्शन

शाच्या वेगवेगळ्या १७ बॅँकांकडून ९ हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज न फेडता  गुपचूप देश सोडून लंडनला गेलेले व्यावसायिक विजय मल्ल्या मीडियामध्ये सध्या चर्चेत आहेत. विजय मल्ल्याचे चर्चेत असण्याचे एक कारण त्यांचे उच्च राहणीमानदेखील आहे. बॉलिवूडच्या झगमगत्या जगाशीही त्यांनी कायम विशेष संबंध जपले आहेत. कधी पडद्याच्या मागे राहून चित्रपट बनविण्यावरुन, तर कधी चित्रपट सुंदरींसोबत डेटिंगवरून त्यांचे किस्से गाजत राहिले. विजय मल्ल्याचे बॉलिवूडशी असलेले दोन कनेक्शन जास्त चर्चेत राहिले आहेत. पहिले कनेक्शन किंग फिशरचे कॅलेंडर. ज्यात    देश-विदेशातून निवडक सुंदरी स्टारडम सारखा रुबाब मिळवायच्या.

या सर्वांमागे मल्ल्याच होते. प्रत्येक वर्षी किंग फिशर कॅलेंडरच्या लॉँचिंग समारोहात सहभागी होण्यासाठी बॉलिवूडच्या सिताºयांमध्ये मोठी चढाओढ असायची. या समारोहात फॅशन आणि बॉलिवूडचे दिग्गज नेहमी दिसायचे. विजय मल्ल्याचे दुसरे कनेक्शन आईपीएलमध्ये त्यांची टीम जी बेंगळूरूची होती. मल्ल्यांच्या टीमसाठी क धी कॅटरिना कैफ ब्रँड अँबेसीडर बनली, तर कधी दीपिका पादुकोण. दीपिकाचे मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ सोबतदेखील जवळचे नाते होते.  मधूर भांडारकरने जेव्हा ‘कॅलेंडर गर्ल’ चित्रपट बनविला तेव्हा त्याची विजय मल्ल्याच्या जीवनाशी तुलना करण्यात आली.

यात एक रहस्य नक्की उलगडले की, कॅलेंडर गर्लची एक सुंदरी मल्ल्याच्या आयुष्यात  एअरलाईन्सची कू्र  सदस्य राहिली आहे. बॉलिवूडमध्ये चर्चा इथपर्यंत होती की, मल्ल्याने पडद्याच्या मागे राहून कित्येक चित्रपटांना फायनान्स केले आहे. सुनील शेट्टी आणि संजय दत्त सोबतच्या दिग्दर्शक मणिशंकरच्या एका चित्रपटात विजय मल्ल्याचा पैसा लागल्याची चर्चा होती. मात्र मल्ल्यांनी कधीही हे मान्य केले नाही. सुनील शेट्टी पासून ते शाहरुख आणि सलमानपर्यंत मल्ल्याचे सर्व स्टार्सशी जवळचे संबंध राहिले.  नायिकांच्या बाबतीत सांगायचे झाले तर, या काळातील क्वचितच अशी एखादी नायिका असेल जी मल्ल्यांच्या पार्ट्यांचा हिस्सा बनली नसेल.

Web Title: Vijay Malli Bollywood connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.