View Pics : मित्र अहान पांडेसोबत सिनेमा बघायला गेली होती शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 21:43 IST2017-08-23T15:19:27+5:302017-08-23T21:43:14+5:30

सुपरस्टार शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाली ...

View Pics: Shah Rukh Khan's Ladki Lake Suhana Khan went to see a movie with friend Ahaan Pandey! | View Pics : मित्र अहान पांडेसोबत सिनेमा बघायला गेली होती शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान!

View Pics : मित्र अहान पांडेसोबत सिनेमा बघायला गेली होती शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान!

परस्टार शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान सध्या प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. यावेळी तिचे फ्रेंड सर्कल तिच्यासोबत होते. सुहानाने फॅशन वीकमध्ये छायाचित्रकारांना पोज देत फोटोसेशनही केले. आता पुन्हा एकदा सुहाना चर्चेत आली आहे. होय, काल सुहाना मुंबई येथील एका चित्रपटगृहात मित्र अहान पांडे याच्यासोबत चित्रपट बघायला गेली होती. जेव्हा हे दोघे चित्रपटगृहाबाहेर निघत होते, तेव्हाच त्यांचे काही फोटोज् क्लिक करण्यात आले. 





कॅजुअल लूकमध्ये असलेली सुहाना खूपच सुंदर दिसत होती. कॅमेरे दिसताच नेहमीप्रमाणे ती काहीशी घाबरलेली. तिने मान खाली घालून कारच्या दिशेने धाव घेतली. तर अहाननेदेखील तेथून झटपट निघणे पसंत केले. अहान पांडे अभिनेता चंकी पांडेचा पुतण्या आहे. दरम्यान, सुहानाने यावेळी कारगो आणि क्रॉप टॉप परिधान केला होता. अहानदेखील कॅजुअल अंदाजातच होता. 





हे दोन्ही स्टारकिड्स कॅमेरे बघताच काहीशे चलबिचल झाले. दोघेही घाबरले होते. मात्र अहानने काहीसे धाडस केले. सुरुवातीला त्याने कॅमेरामॅनला पोज दिली. त्यानंतर तो थेट कारकडे निघाला. तर सुहाना नेहमीप्रमाणेच कॅमेºयापासून स्वत:ची सुटका करून घेताना दिसली. या अगोदर हे दोघे लॅक्मे फॅशन वीकमध्ये बघावयास मिळाले होते. 





सुहानाला पप्पा किंग खानप्रमाणेच अभिनयात करिअर करायचे आहे. त्यासाठी ती तयारीही करीत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरूख खानने एका मुलाखतीत सुहानाला अभिनयात रस असल्याचे म्हटले होते. सध्या सुहाना शिकत आहे. शाहरूखच्या मते, सुहानाने अगोदर तिचे शिक्षण पूर्ण करावे, त्यानंतरच अभिनयाचा विचार करावा. सुहानादेखील त्याच दिशेने पाऊल टाकत आहे. सुहाना पप्पा शाहरूखची प्रचंड लाडकी लेक आहे. 

Web Title: View Pics: Shah Rukh Khan's Ladki Lake Suhana Khan went to see a movie with friend Ahaan Pandey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.