View Pics : चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ईशा गुप्ताने शेअर केले बिकिनी फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 22:18 IST2017-09-03T16:48:25+5:302017-09-03T22:18:51+5:30

न्यूड फोटोज् सोशल मीडियावर शेअर करून खळबळ उडवून देणाºया ईशाने पुन्हा एकदा बिकिनी फोटोज् शेअर करून आग लावली आहे.

View Pics: Isha secretly shared bikini photos to celebrate the success of the film! | View Pics : चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ईशा गुप्ताने शेअर केले बिकिनी फोटो!

View Pics : चित्रपटाच्या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ईशा गुप्ताने शेअर केले बिकिनी फोटो!

ल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ईशा गुप्ता सातत्याने कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत आहे. अगोदर न्यूड फोटोज् सोशल मीडियावर शेअर करून खळबळ उडवून देणाºया ईशाने पुन्हा एकदा बिकिनी फोटोज् शेअर करून आग लावली आहे. वास्तविक ईशाच्या न्यूड फोटोवर टीकाही करण्यात आली होती, परंतु ईशाने टीकाकारांना सडेतोड उत्तर देत बोल्ड फोटोज् शेअर करण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे. ईशाचा नुकताच ‘बादशाहो’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने ईशासह संपूर्ण टीम खूश आहे. 

या आनंदाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ईशाने पुन्हा एकदा आपला बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांशी शेअर केला आहे. अर्थात अशाप्रकारचा आनंद व्यक्त करण्याचा निर्णय स्वत: ईशानेच घेतला असेल. यासाठी तिने बाली गाठले असून, याठिकाणी ती छोटेशे व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. पांढºया रंगाची बिकिनी घातलेल्या ईशाचे फोटो बघून तुमच्याही लक्षात ते येईल. काही दिवसांपूर्वी ईशाने न्यूड फोटोशूट केले होते. तिचे हे फोटोज् वाºयासारखे व्हायरलही झाले होते. 
 

याविषयी ईशाने टाइम्स आॅफ इंडियाशी बोलताना म्हटले होते की, ‘मी अशाप्रकारचे फोटोशूट तेव्हादेखील केली होते जेव्हा मी मॉडेल होती. या अगोदरदेखील मी टॉपलेस आणि न्यूड झालेली आहे. त्यावेळी कोणीही मला याविषयी विचारणा केली नव्हती. मुळात हे लोक कोण आहेत, ज्यांना माझे हे फोटो बघून अडचण होत आहे? हे माझे शरीर आहे. मला असे वाटते की, एक लाइन असते ज्याला कोणीही पार करायला नको. जर तुम्ही माझे फोटो बघाल तर तुमच्या लक्षात येईल की ते वल्गर नाहीत. मला या फोटोसाठी टोमण्यांपेक्षा प्रेम मिळाले आहे,’ असेही ईशा म्हणाली होती. 

‘बादशाहो’ चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास अजय देवगण, इलियाना डिक्रूज, इमरान हाशमी, संजय गुप्ता आणि विद्युत जामवाल या कलाकारांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. दोनच दिवसात चित्रपटाने तब्बल २७ कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. तिसºया दिवशी हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

Web Title: View Pics: Isha secretly shared bikini photos to celebrate the success of the film!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.