विद्या बालनच्या या सहकलाकाराकडे गाडी खर्चासाठी देखील नव्हते पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 03:35 PM2019-06-22T15:35:59+5:302019-06-22T15:59:05+5:30

विद्यासोबत हा कलाकार एका चित्रपटात झळकला असून त्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते.

Vidya Balan Tumhari Sulu co actor manav kaul was in depression | विद्या बालनच्या या सहकलाकाराकडे गाडी खर्चासाठी देखील नव्हते पैसे

विद्या बालनच्या या सहकलाकाराकडे गाडी खर्चासाठी देखील नव्हते पैसे

googlenewsNext
ठळक मुद्देकाय पो छे या चित्रपटाच्या आधी त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचा किस्सा मानवने नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे. या पार्टीनंतर त्याच्याकडे घरी जायला देखील पैसे नव्हते. त्यामुळे तो पार्टी संपल्यानंतर चक्क चालत घरी गेला

बॉलिवूडमध्ये कधी काय होऊ शकते हे सांगू शकत नाही. कधीतरी अतिशय प्रसिद्ध कलाकाराला देखील वाईट दिवसांमधून जावे लागते. तसेच नव्या कलाकारांना तर स्ट्रगल करण्याशिवाय पर्यायच नसतो. विद्या बालनचा तुम्हारी सुलू हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात विद्यासोबत आपल्याला मानव कौलला पाहायला मिळाले होते. मानव हा खूप चांगला अभिनेता असण्यासोबतच एक चांगला लेखक, दिग्दर्शक देखील आहे.

मानवने २००४ पासून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने अनेक नाटकांमध्ये देखील काम केले आहे. जजंतरम ममंतरम हा त्याने अभिनय केलेला पहिला चित्रपट होता. त्याने यानंतर काही वर्षांनी हंसा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड दिग्दर्शक म्हणून त्याच्या करियरला सुरुवात केली. अभिनय, दिग्दर्शक अशा दोन्ही क्षेत्रात कार्यरत असून देखील मानवला बॉलिवूडमध्ये ओळख मिळत नव्हती. पण काय पो छे या चित्रपटाती त्याची भूमिका गाजली आणि त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 

काय पो छे या चित्रपटाच्या आधी त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचा किस्सा मानवने नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे. या पार्टीनंतर त्याच्याकडे घरी जायला देखील पैसे नव्हते. त्यामुळे तो पार्टी संपल्यानंतर चक्क चालत घरी गेला होता. हा काळ त्याच्यासाठी वाईट होता. तो डिप्रेशनमध्ये देखील गेला होता. पण पुस्तकांच्या मदतीने तो डिप्रेशनमधून बाहेर आला. त्याने या दरम्यान नाटकांचे दिग्दर्शन केले. तसेच छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आणि स्वतःला कामात झोकून दिले.

जॉनी एलएलबी, जय गंगाजल यांसारख्या चित्रपटांमधील मानवच्या भूमिकांचे कौतुक झाले. पण तुम्हारी सुलू हा चित्रपट त्याच्या करियरसाठी टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटात त्याने साकारलेला नायक प्रेक्षकांना प्रचंड भावला. त्यावर चित्रीत झालेले बन जा तू मेरी राणी... हे गाणे तर प्रचंड गाजले. या चित्रपटानंतर त्याने बदला, दोबारा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तो अनेक वेबसिरिजमध्ये देखील सध्या महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहे. 

Web Title: Vidya Balan Tumhari Sulu co actor manav kaul was in depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.