'मायावती' यांच्यावरही बनणार बायोपिक, 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 02:36 PM2019-03-28T14:36:43+5:302019-03-28T14:40:15+5:30

बॉलीवूडमध्ये लकरच आणखीन एका राजकीय नेत्यावर आधारित बायोपिक येण्याची तयारी सुरू झाली आहे. यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Vidya Balan To Play Lead In BSP Leader Mayawati Biopic | 'मायावती' यांच्यावरही बनणार बायोपिक, 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका

'मायावती' यांच्यावरही बनणार बायोपिक, 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका

googlenewsNext

निवडणुका जशा जवळ येत आहेत तस तसं हिंदी चित्रपटसृष्टीत विविध राजकीय नेत्यांच्या जीवनावरील बायोपिक रुपेरी पडद्यावर येण्याची जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे की काय असं चित्र पाहायला मिळत आहे. एक ना अनेक व्यक्तींच्या जीवनावरील बायोपिक रसिकांची दाद मिळवून गेले आहेत. गेल्या काही महिन्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे', माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील 'द एक्सिडेंटल प्राइमिनिस्टर' यांच्या जीवनावरील सिनेमा रसिकांच्या भेटीला आले. आता बॉलीवूडमध्ये लकरच आणखीन एका राजकीय नेत्यावर आधारित बायोपिक येण्याची तयारी सुरू झाली आहे. यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर आधारित बायोपिक येणार आहे. सुभाष कपूर सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. मायावती यांच्या जीवनप्रवासावर आधारित कथांचं  विद्या बालनने वाचनही सुरू केले आहे. मायावतींच्या भूमिकेसाठी खूप सा-या ऑडिशन्स  घेण्यात आले होते. त्यानुसार जवळपास 7 ते 8 अभिनेत्रींची नावं शॉर्ट लिस्ट करण्यात आली. त्यापैकी विद्या बालनच्या नावावर मायावती यांच्या भूमिकेसाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे नक्कीच इतर बायोपिक प्रमाणे 'मायावतीं' योपिकची उत्सुकता रसिकांमध्ये निर्माण होणार हे मात्र नक्की. आगामी काळात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावरही सिनेमा येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

विद्या बालनचा हा पहिलाच बायोपिक सिनेमा नाही. यापूर्वीही  विद्या बालनने 'डर्टी पिक्चर' या सिनेमात सिल्क स्मितावर आधारित व्यक्तीरेखा साकारली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. तसेच सुपरस्टार एन.टी. रामाराव अर्थात एनटीआर यांच्या जीवनावरील बायोपिकमध्ये विद्या बालनने प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमात विद्या एनटीआर यांची पहिली पत्नी बसवातारकम यांची भूमिका साकारली होती. यावेळी विद्याचे चेह-याचे हावभाव साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते .  

Web Title: Vidya Balan To Play Lead In BSP Leader Mayawati Biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.