VIDEO : ​टायगर श्रॉफ कानात काहीतरी कुजबुजला अन् दिशा पटनी रॅम्पवरून माघारी वळली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 07:39 AM2017-08-22T07:39:40+5:302017-08-22T13:09:40+5:30

दिशा पटणीसोबतचे आपले नाते टायगर श्रॉफ मान्य करो वा ना करो, पण ही बातमी वाचल्यानंतर टायगर एक ‘बेस्ट बॉयफ्रेन्ड’ आहे, हे तुम्हीही मानाल. होय, अलीकडे झालेल्या लॅक्मे फॅशन वीक2017 मध्ये असेच काही घडले.

VIDEO: Tiger Shroff heard some whisper and turned back from Patni Ramp! | VIDEO : ​टायगर श्रॉफ कानात काहीतरी कुजबुजला अन् दिशा पटनी रॅम्पवरून माघारी वळली!

VIDEO : ​टायगर श्रॉफ कानात काहीतरी कुजबुजला अन् दिशा पटनी रॅम्पवरून माघारी वळली!

googlenewsNext
शा पटणीसोबतचे आपले नाते टायगर श्रॉफ मान्य करो वा ना करो, पण ही बातमी वाचल्यानंतर टायगर एक ‘बेस्ट बॉयफ्रेन्ड’ आहे, हे तुम्हीही मानाल. होय, अलीकडे झालेल्या लॅक्मे फॅशन वीक2017 मध्ये असेच काही घडले. या फॅशन वीकमध्ये टायगर श्रॉफ व दिशा या दोघांना डिझाईनर मनिष मल्होत्रासाठी रॅम्पवर उतरायचे होते. दिशा व टायगरला रॅम्पवर पाहण्यासाठी प्रत्येकजण आतूर होता. सर्वप्रथम टायगर श्रॉफची ग्रॅण्ड एन्ट्री झाली. ब्लॅक ब्लेझर आणि डेनिममध्ये टायगर आधी रॅम्पवर आला. त्याच्यावर सगळ्या फोटोग्राफर्सचे कॅमेरे खिळले. टायगरने मोठ्या ऐटीत सगळ्या फोटोग्राफर्सना पोझ दिली आणि मागे वळला. यानंतर दिशा रॅम्पवर येण्यासाठी पुढे आली. पण हे काय? टायगरने तिला मध्येच थांबवलं आणि हळूच तिच्या कानात काही तरी कुजबुजला. मग काय, दिशा क्षणात रॅम्पवरून माघारी वळली.



ALSO READ : Paparazziनी आणला दिशा पटनी व टायगर श्रॉफच्या नाकात दम!!

आता टायगरने दिशाच्या कानात असे काय सांगितले की, दिशा माघारी वळली. तर टायगरने दिशाला सजग केले.  केवळ सजग केले नाही तर रॅम्पवॉक करताना तिची होऊ घातलेली फजितीही त्याने टाळली. होय, रॅम्प मिररचा बनलेला आहे, हे त्याने दिशाला सांगितले. दिशाने शॉर्ट ड्रेस घातला होता आणि तिने या मिररच्या रॅम्पवर वॉक केला असता तर ती वॉर्डरोब मालफंक्शनची शिकार झाली असती. टायगरने सावध केले नसते तर दिशाची चांगलीच फजिती झाली असती. मग काय, टायगरने सावध केले अन् मग दिशाने खाली उतरून कार्पेट वॉक केला. आहे ना टायगर ‘बेस्ट बॉयफ्रेन्ड’?
 

Web Title: VIDEO: Tiger Shroff heard some whisper and turned back from Patni Ramp!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.