Video : असा साकारला ‘बाहुबली2’ VFX तंत्रज्ञानाच्या साह्याने !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 13:45 IST2017-05-21T08:15:32+5:302017-05-21T13:45:32+5:30
आतापर्यंत तब्बल १५०० करोड रुपये कमाई करणाऱ्या ‘बाहुबली2’ च्या यशामागे हे आहे खरे कारण...सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
.jpg)
Video : असा साकारला ‘बाहुबली2’ VFX तंत्रज्ञानाच्या साह्याने !
महिष्मती साम्राज्य अजूनही बॉक्स आॅफिसवर सत्तेत आहे आणि 'बाहुबली'चे वेड लवकर संपणार नाही, असेही दिसत नाही. रिलीज झाल्यापासून आजपर्यंत या चित्रपटाने सुमारे 1500 कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी यशाचे श्रेय व्हीएफएक्स संघाला देतात. राष्ट्रीय पुरस्कार विजेता व्ही. श्रीनिवास मोहन 'बाहुबली: द बिनगिनिंग' चे व्हीएफएक्स पर्यवेक्षक होते.
जगभरातून 35 पेक्षा अधिक स्टुडिओज 'बाहुबली' प्रवासाचा भाग होते. किंबहुना, असे आढळून आले की व्हीएफएक्स संघाने त्यांचे पोस्ट-प्रॉडक्शनचे काम केवळ रिलीजच्या 10 दिवस आधीच पूर्ण केले.
