Video: आमिरची लेक रुळतीये मराठी कुटुंबात; होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला मराठीत उखाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 01:57 PM2023-11-07T13:57:01+5:302023-11-07T13:57:42+5:30

Ira khan: जानेवारी २०२४ मध्ये आयरा आणि नुपूर शिखरे लग्नाच्या बंधनात बांधले जाणार आहेत

Video: Aamir's Lake Rulatiye in Marathi Family; Marathi sayings for future husband | Video: आमिरची लेक रुळतीये मराठी कुटुंबात; होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला मराठीत उखाणा

Video: आमिरची लेक रुळतीये मराठी कुटुंबात; होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला मराठीत उखाणा

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान (aamir khan) याची लेक लवकरच लग्नाच्या बंधनात अडकली जाणार आहे. जानेवारी २०२४ मध्ये आयरा खान (ira khan) तिच्या प्रियकरासोबत नुपूर शिखरेसोबत (nupur shikhare)  लग्न करणार आहे. त्यामुळे या दोन्ही कुटुंबामध्ये सध्या लग्नाची गडबड सुरु झाली आहे. नुकताच आयरा आणि नुपूर यांच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. विशेष म्हणजे यावेळी आयराने चक्क मराठीत उखाणा घेतला. तिचा हा उखाणा घेतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयराने तिच्या इन्स्टाग्रामवर  केळवणाच्या कार्यक्रमाचे काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. यात कुटुंबियांच्या आग्रहास्तव तिने चक्क मराठीत उखाणा घेतला. 'मला मराठी येत नाही पण नुपूरसाठी मी कधी नाही म्हणत नाही', असा उखाणा आयराने घेतला. विशेष म्हणजे महाराष्ट्रीयन संस्कृती आयरा आत्मसाद करत असल्याचं पाहून नेटकऱ्यांना तिचं कौतुक वाटलं आहे. त्यामुळे अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, या केळवणाच्या कार्यक्रमाला आयराने छान गुलाबी-पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. सोबतच नाकात नथही घातली होती. यावेळी तिच्यासोबत तिची आई रीना दत्ता, नुपूरची आई प्रितम शिखरे, मिथिला पालकर असे बरेच मित्र-मंडळी, आप्तेष्ट होते. आयराने नोव्हेंबर २०२२ मध्ये नुपूर शिखरेसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर जानेवारी २०२४ ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे सध्या त्यांच्याकडे लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे.

Web Title: Video: Aamir's Lake Rulatiye in Marathi Family; Marathi sayings for future husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.