‘पद्मावती’मध्ये दिसणार विकी कौशल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 10:51 IST2016-06-23T05:21:58+5:302016-06-23T10:51:58+5:30
गेल्या वर्षी समीक्षक आणि सिनेरसिकांची वाहवाह मिळवलेल्या ‘मसान’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या विकी कौशलचे सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत असे ...

‘पद्मावती’मध्ये दिसणार विकी कौशल?
ग ल्या वर्षी समीक्षक आणि सिनेरसिकांची वाहवाह मिळवलेल्या ‘मसान’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या विकी कौशलचे सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत असे वाटतेय.
कारण अशी चर्चा आहे की, संजय लीला भंसाळींच्या पुढच्या मेगा बजेट चित्रपटात एका महत्त्वाच्या रोलसाठी विकीची निवड करण्यात आली आहे.
राणी पद्मावतींवर आधारित या चित्रपटात विकी पद्मावतींचा पती म्हणजेच राजा रावल रतन सिंगची भूमिका साकारणार. २८ वर्षीय विकीच्या ‘मसान’ व ‘रमण राघव २.०’ चित्रपटातील अभिनयाने प्रभावित होऊन भंसाळीने त्याला कास्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येतेय.
मेवाडची राणी पद्मावतीबद्दल अलाऊद्दीन खिलजीला असणारे अवास्तव आकर्षण हा या चित्रपटाचा विषय आहे. मुख्य भूमिकेत कोणाची वर्णी लागणार हे अद्याप जरी ठरलेले नसले तरी रणवीर-दीपिका तिसऱ्यांदा भंसाळीच्या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे.
लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार असून पुढच्या वर्षी डिसेंबर महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे.