'सरदार उधम सिंग'च्या बायोपिकसाठी विक्की कौशल अशी घेतोय मेहनत, वाचून तुम्हीही कराल कौतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:28 PM2019-10-02T13:28:29+5:302019-10-02T13:32:18+5:30

विक्की कौशलने कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे. उरी सिनेमानंतर विक्की कौशल हे नाव एक रात्रीत घराघरात पोहोचले.

Vicky kaushal sheds 13 kilos in 3 months for sardar udham singh biopic | 'सरदार उधम सिंग'च्या बायोपिकसाठी विक्की कौशल अशी घेतोय मेहनत, वाचून तुम्हीही कराल कौतूक

'सरदार उधम सिंग'च्या बायोपिकसाठी विक्की कौशल अशी घेतोय मेहनत, वाचून तुम्हीही कराल कौतूक

googlenewsNext

विक्की कौशलने कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे. उरी सिनेमानंतर विक्की कौशल हे नाव एक रात्रीत घराघरात पोहोचले. सध्या विक्की त्याचा आगामी सिनेमा उधम सिंगला घेऊन चर्चेत आहे.  सरदार उधम सिंगच्या भूमिकेसाठी विक्की खूप मेहनत घेतो आहे. 3 महिन्यात विक्कीने 13 किलो वजन कमी केले आहे.  


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, विक्कीसाठी 3 महिन्यात 13 किलो वजन कमी करणं इतके सोपो नव्हते. विक्की कौशल पंजाबी कुटुंबातील असल्याने खाण्यावर कंट्रोल करणे हे त्याच्यासाठी खूप कठीण होते. त्यामुळे त्याने ट्रेनरसोबत प्रचंड मेहनत घेतली. वजन कमी करण्यासाठी त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. लवकरच विक्की उधम सिंगच्या शूटिंगसाठी 25 दिवस अमृतसरला जाणार आहे. बाकी असलेले शूटिंग करण्यासाठी विक्कीला पुन्हा वजन वाढवण्याची गरज असणार आहे. 


शूजीत सरकार दिग्दर्शित सरदार उधम सिंगमध्ये विकी खूपच भूमिका साकारताना दिसणार आहे. 'सरदार उधम सिंग' हा सिनेमा भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातील आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, अशाच एका स्वातंत्र्य सैनिकाची गोष्ट आपल्याला 'सरदार उधम सिंग' या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

 उधम सिंग 2 ऑक्टोबर 2020ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  सरदार उधम सिंग या चित्रपटात उधम सिंगची व्यक्तिरेखा पहिल्यांदा इरफान खान साकारणार होता. पण इरफानने आजारपणामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यामुळे या भूमिकेसाठी विकीची निवड करण्यात आली.
 

Web Title: Vicky kaushal sheds 13 kilos in 3 months for sardar udham singh biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.