बॉलिवूडला आणखी एक धक्का, विकी कौशलला कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 12:03 PM2021-04-05T12:03:39+5:302021-04-05T12:04:50+5:30

अभिनेता विकी कौशलला कोरोनाची लागण झाली असून त्याने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे.

vicky kaushal positive for coronavirus, shared note on social media | बॉलिवूडला आणखी एक धक्का, विकी कौशलला कोरोनाची लागण

बॉलिवूडला आणखी एक धक्का, विकी कौशलला कोरोनाची लागण

googlenewsNext
ठळक मुद्देविकी कौशलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिले आहे की, काळजी घेऊनही दुर्देवाने मला कोरोनाची लागण झाली आहे. मी सध्या डॉक्टरांनी दिलेली औषधं घेत असून घरातच क्वांरंटाईन आहे.

अक्षय कुमार, गोविंदा यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांनी नुकतेच सोशल मीडियाद्वारे सांगितले होते. आता अभिनेता विकी कौशलला कोरोनाची लागण झाली असून त्याने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे.

विकी कौशलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात लिहिले आहे की, काळजी घेऊनही दुर्देवाने मला कोरोनाची लागण झाली आहे. मी सध्या डॉक्टरांनी दिलेली औषधं घेत असून घरातच क्वांरंटाईन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी... सगळ्यांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा...

कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, मनोज वाजपेयी, आमिर खान,आर. माधवन, गोविंदा आणि अक्षय कुमार, भूमी पेडणेकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.

बॉलिवूड कोरोनाच्या विळख्यात 
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील बऱ्याच कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यात रणबीर कपूर, आर. माधवन, मनोज वाजपेयी, आमिर खान, आलिया भट, फातिमा सना शेख, गोविंदा, अक्षय कुमार, भूमी पेडणेकर या कलाकारांचा समावेश आहे.

राम सेतूच्या सेटवर कोरोनाचा विस्फोट 
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर सध्या शुटिंग सुरू असलेल्या त्याच्या 'राम सेतू' चित्रपटातील सेटवरील तब्बल ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या सेटवर इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे चित्रीकरण थांबविण्यात आले आहे.

Web Title: vicky kaushal positive for coronavirus, shared note on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.