विकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 17:00 IST2018-11-20T17:00:00+5:302018-11-20T17:00:00+5:30
मसान, राजी आणि संजू सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण करणार अभिनेता म्हणजे विकी कौशल. विकी कौशल आपल्या पर्सनल लाईफबाबत नेहमीच मोकळेपणे बोलतो.

विकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली
मसान, राजी आणि संजू सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण करणार अभिनेता म्हणजे विकी कौशल.विकी कौशल आपल्या पर्सनल लाईफबाबत नेहमीच मोकळेपणे बोलतो. त्यांने आपले रिलेशनशीप कधी लपवण्याचा प्रयत्नदेखील केला नाही.
गेल्या काही दिवसांपासून विकीसोबत त्याची कथित गर्लफ्रेंड हरलीन सेठी दिसतोय. दोघे फोटोग्राफर्ससमोर देखील बिनधास्त वावरताना दिसतात. विकी आणि हरलीनने अद्याप आपलं नातं सर्वाजनिकपणे स्वीकारले देखील नाही. मात्र विकीने सोशल मीडियावर कथित लव्ह स्टोरीबाबतची हिंट दिली आहे.
विकीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात हरलीन सेठी आणि विक्रांत मेस्सी दिसतायेत. या फोटोला विकीने एक कॅप्शनसुद्धा दिले आहे, ''मेरे दो अनमोल रतन.'' या फोटोवरुन विकी आणि हरलीनमधलं नात्यामध्ये खास कनेक्शन असल्याचे दिसतेय.
रिपोर्टनुसार विकी आणि हरलीनची ओळख त्यांचा कॉमन फ्रेंड आनंद तिवारीमुळे झाली. त्यानंतर ते एकमेकांना आवडू लागले. प्रोफेशनल लाईफबाबत बोलायचे झाले तर हरलीन लवकरच 'ब्रोकेन बट ब्यूटीफुल' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. विकी उरी सिनेमात दिसणार आहे. 'उरी द सर्जिकल स्ट्राइक' सिनेमाचा विषय भारतीयांसाठी भावनिक मुद्दा आहे. कारण उरी अॅटॅकनंतर प्रत्येक जणांना वाटत होते की पाकिस्तानलाही तसेच प्रत्युत्तर दिले पाहिजे आणि त्यानंतर भारतीय सैनिकांनी सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यावेळी संपूर्ण भारताने जवानांचे कौतूक केले होते. 11 जानेवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.