वरूणने त्याचे फेव्हरेट जॅकेट केले दान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 18:37 IST2016-11-29T18:32:52+5:302016-11-29T18:37:55+5:30

वरूण धवन सध्याच्या बेस्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जातोय. तरूणाईमध्ये त्याची क्रेझ प्रचंड आहे. काही सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांसाठी काहीही करायला ...

Varun donates his favorite jacket? | वरूणने त्याचे फेव्हरेट जॅकेट केले दान?

वरूणने त्याचे फेव्हरेट जॅकेट केले दान?

ूण धवन सध्याच्या बेस्ट अभिनेत्यांपैकी एक मानला जातोय. तरूणाईमध्ये त्याची क्रेझ प्रचंड आहे. काही सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांसाठी काहीही करायला तयार होतात. आता हेच पाहा ना! वरूणने म्हणे त्याने ‘ढिशूम’ चित्रपटात घातलेले त्याचे फेव्हरेट जॅकेट दान करून टाकले. विश्वास बसत नाही ना? पण हे खरंय. जॅकेट एका मुलाला देताना त्याने क्षणाचाही विचार केला नाही. त्याच्या मते, चाहत्यांचे प्रेमच त्याला कुठल्याही वस्तू, बाबींपेक्षा अनमोल आहे. 

                 

‘स्लम सॉसर - क्रिडा विकास संस्था’ या सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात तो नुकताच गेला होता. तेव्हा त्याला त्याच्या सामाजिक बांधिलकीविषयी विचारले असता तो म्हणाला,‘मला लहानपासूनच आई-वडिलांनी माझ्याजवळच्या वस्तू शेअर करण्याची सवय लावली आहे. समाजाचे आपण काही देणं लागतो. त्यांच्यासाठी आपण काहीतरी उपक्रम करायला हवेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदासाठी मी माझी फेव्हरेट वस्तूही दान करू शकतो.’ असे बोलत असतानाच त्याने स्वत: अंगात घातलेले ‘ढिशूम’ फेम जॅकेट काढून तेथील अधिकाऱ्याला देऊन टाकले. त्यानंतर तो म्हणाला,‘ढिशूम हा चित्रपट माझा भाऊ रोहित धवननेच बनवलाय. खासकरून मुलांसाठी त्या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे या जॅकेटविषयी माझ्या मनात विशेष आस्था आहे.’ 

वरूण धवन सध्या ‘जुडवा २’ मुळे चर्चेत आहे. ‘जुडवा’ मधील सलमान खानचा अभिनय पाहता त्याच्यासाठी हा चित्रपट म्हणजे आव्हानच आहे. सलमानपेक्षा त्याची भूमिका कशी सरस असेल? यासाठी तो आता प्रयत्न करताना दिसतोय. या चित्रपटात त्याच्यासोबत सहकलाकार अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस  आणि तापसी पन्नू असणार आहेत.

Web Title: Varun donates his favorite jacket?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.