Varun Dhawan's Wedding: नताशा बनणार वरूण धवनची ‘दुल्हनिया’, म्हणून बदलली ‘स्ट्रिट डान्सर 3D’ची रिलीज डेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 13:23 IST2019-06-24T13:20:30+5:302019-06-24T13:23:00+5:30
‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ हा चित्रपट आधी ८ नोव्हेंबर २०१९ला प्रदर्शित होणार होता. पण मागच्याच महिन्यांत या चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटचा खुलासा झाला होता.चित्रपटाची रिलीज डेट ८ नोव्हेंबरवरून पुढील वर्षी २४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. असे का? तर आता या कारणाचा खुलासा झाला आहे.

Varun Dhawan's Wedding: नताशा बनणार वरूण धवनची ‘दुल्हनिया’, म्हणून बदलली ‘स्ट्रिट डान्सर 3D’ची रिलीज डेट!
‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या चित्रपटाची प्रतीक्षा करणाऱ्या वरूण धवनच्या चाहत्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. होय, वरूण धवन गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटात बिझी आहे. आधी हा चित्रपट ८ नोव्हेंबर २०१९ला प्रदर्शित होणार होता. पण मागच्याच महिन्यांत या चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटचा खुलासा झाला होता.चित्रपटाची रिलीज डेट ८ नोव्हेंबरवरून पुढील वर्षी २४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. असे का? तर आता या कारणाचा खुलासा झाला आहे. सूत्रांचे मानाल तर वरूण धवनच्या लग्नामुळे ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. अर्थात खुद्द वरूण व वरूणचे पिता डेव्हिड धवन दोघेही ही गोष्ट नाकारत आले आहेत.
ताजी बातमी खरी मानाल तर यंदा डिसेंबर महिन्यात वरूण गर्लफ्रेन्ड नताशा दलाल हिच्यासोबत लग्न करतोय. स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नामुळेच वरूणने ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ची रिलीज डेट पुढे ढकलण्याची मागणी दिग्दर्शक रेमो डिसुजाकडे केली होती. वरूणच्या विनंतीखातर रेमोने चित्रपटाची रिलीज डेट बदलली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वरूण डेस्टिनेशन वेडिंगची प्लानिंग करतोय. त्याने राजस्थानची निवड केली आहे. दोन्ही कुटुंबांनी लग्नासाठी जोधपूरच्या दोन पॅलेसची निवड केली आहे. इतकेच नाही तर वरूणने वेडिंग प्लानर हायर केल्याचेही कळतेय.
निक व प्रियंकाच्या लग्नाचे प्लानिंग करणा-या वेडिंग प्लानरवरच ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वरूण व नताशा हिंदू पद्धतीने विवाह सोहळा करणार असल्याचे कळतेय. तीन दिवस हा विवाह सोहळा चालेल. अद्याप वरूणने या लग्नाबद्दल कुठलाही खुलासा केलेला नाही. पण ‘स्ट्रिट डान्सर 3’ची रिलीज डेटमुळे अखेर त्याचा खुलासा झालाच. नताशा ही वरुणची बालपणीची मैत्रिण आहे. अलीकडे वरूण व नताशा अनेकदा एकत्र दिसले आहेत. वरुणच्या घरच्या सगळ्या इव्हेंटला नताशा व तिचे कुटुंब हजर असते.