वरूण धवनला चाहतीने दिली आत्महत्येची धमकी! वरूणवरचं होऊ शकतो गुन्हा दाखल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 11:22 IST2017-11-09T05:52:36+5:302017-11-09T11:22:36+5:30
चाहत्यांच्या प्रेमासाठी सेलिब्रिटी नेहमीच आसुसलेले असते. बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल बोलायचे तर, त्यांच्यासाठी चाहत्यांचे प्रेम हेच सगळ्यांत मोठे असते. पण याच ...

वरूण धवनला चाहतीने दिली आत्महत्येची धमकी! वरूणवरचं होऊ शकतो गुन्हा दाखल!!
च हत्यांच्या प्रेमासाठी सेलिब्रिटी नेहमीच आसुसलेले असते. बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल बोलायचे तर, त्यांच्यासाठी चाहत्यांचे प्रेम हेच सगळ्यांत मोठे असते. पण याच बॉलिवूड सेलिब्रिटींना अनेकदा चाहत्यांमुळे मनस्तापाला सामोरे जावे लागल्याचीही उदाहरणे आहेत. सध्या अभिनेता वरूण धवन यालाही असाच मनस्ताप सहन करावा लागतोय. होय, एका चाहतीमुळे वरूण धवन कमालीचा वैतागला आहे. इतका की, तिच्यामुळे त्याला पोलिसांत धाव घ्यावी लागलीय. आता हे नेमके प्रकरण काय, हे तर कळायलाच हवे. ही चाहती वरूणवर इतकी फिदा आहे की, तिने वरुणला थेट आत्महत्या करण्याची धमकी(?) दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ती वरुणला व्हॉट्स अॅपवर सतत मेसेज करत होती. तिच्या मेसेजला कंटाळून वरुणने अखेर तिचा नंबर ब्लॉक केला. नंबर ब्लॉक झाल्याचे कळताच ती मेसेज करणे बंद करेल, असा वरूणचा अंदाज होता. पण झाले भलतेच. काही दिवसानंतर वरूणला पुन्हा अनोळखी नंबरवरून कॉल्स येऊ लागले. हा अनोळखी नंबर एका मुलाचा होता. वरूणने हा कॉल घेतल्यावर त्या मुलाने अप्रत्यक्षपणे धमकीच दिली. तू तिच्या व्हॉट्सअॅप मेसेजला उत्तर दिले नाहीस तर तीआत्महत्या करेल, अशी ती धमकी होती. त्या मुलाची धमकी ऐकून वरूण हादरला. अखेर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्याने याप्रकरणी पोलिसांची मदत घेणेच बेहतर समजले. तक्रार नोंदवण्यासाठी वरूण जुहू पोलिस ठाण्यात पोहोचला. पण वरूणचे घर सांताक्रूझ पोलीस स्थानकाच्या हद्दीत येत असल्यामुळे पोलिसांनी त्याला तेथे तक्रार नोंदवण्याचा सल्ला देण्यात आला. याप्रकरणी आयपीसीच्या कलम ५०६ अन्वये तक्रार नोंदवण्यात आली आहे. वरुणच्या तक्रारीनंतर आता याप्रकरणी तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार
ALSO READ: आलिया भट्टने मागितला ‘किस’; वरूण धवनने दिला नकार! पाहा, एक इंटरेस्टिंग व्हिडिओ!!
तर वरूणविरूद्धच गुन्हा??
माजी आयपीएस अधिकारी व वकील वाय.पी. सिंह यांच्या मते, या प्रकरणात कलम ५०६ लावणे चूक आहे. ही कलम धमकी दिल्यावर लावली जाते. पण त्या चाहतीच्यावतीने एका मुलाने वरूणला फोन केला आहे. तू उत्तर दिले नाहीस तर ती आत्महत्या करेल, असे त्याने म्हटले. ही धमकी नसून सूचना आहे. मुलाचा उद्देश मुलीचा जीव वाचवणे आहे. त्यामुळे पोलिस ठरवले तर तेच वरूणविरोधात आयपीसीच्या कलम १७७ अन्वये सरकारी कर्मचाºयास चुकीची माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करू शकतात.