बँड बाजा बारात, लवकरच चढणार बोहल्यावर, वरुण धवनने लग्नाविषयी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2021 18:53 IST2021-01-11T18:52:23+5:302021-01-11T18:53:03+5:30
वरूण व नताशा हे बालपणापासूनचे मित्र आहेत. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघेही अनेकदा एकत्र दिसले. अनेक सार्वजनिक ठिकाणी किंवा पार्टीमध्ये अनेक वेळा दोघे एकत्र दिसतात.

बँड बाजा बारात, लवकरच चढणार बोहल्यावर, वरुण धवनने लग्नाविषयी केला खुलासा
सध्या लग्नाचा मौसम सुरु आहे. कोरोनामुळे अनेकांनी लग्नाचे प्लॅनिंग पुढे ढकलले तर काहींनी कमी लोकांची उपस्थितीतच लग्नबंधनात अडकले. वरुण आणि नताशाच्याही लग्नाच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र कोरोनामुळे या दोघांनीही लग्नाचे प्लॅनिंग पुढे ढकलले. दरम्यान या दोघांनी लॉकडाऊनदरम्यान लग्न केले नसले तरी साखरपुडा केल्याचीही चर्चा रंगली. मात्र यावर दोघांकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण आले नाही. त्यामुळे साखपुड्याचीही चर्चा चर्चाच ठरल्या. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल होत असतात. या दोघांच्या फोटोंमुळे कपल कधी लग्नबंधनात अडकणार याविषयी चर्चा अधिक रंगत असतात.
लग्नाबद्दल विचारलं असता वरुण म्हणाला, 'सध्या सगळीकडे आम्ही जिथे जातो तिथे आमच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला जात आहे. मात्र लग्ना विषयी सध्या तरी काही आमची तयारी नाही. सध्या जगात इतकी अनिश्चितता आहे, पण जर परिस्थिती सुधारली तर लवकरच कदाचित यावर्षीच लग्न होईल.' तसंच अलीकडेच झालेल्या करीना कपूरच्या 'व्हॉट वुमेन वॉन्ट' या शोमध्ये वरुणनं गर्लफ्रेंड नताशा दलालचा 'मंगेतर' असा उल्लेख केला. त्यामुळे लवकरच वरुण लग्नबंधनात अडणार हे मात्र नक्की.
वरूण व नताशा हे बालपणापासूनचे मित्र आहेत. पुढे ते एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघेही अनेकदा एकत्र दिसले. अनेक सार्वजनिक ठिकाणी किंवा पार्टीमध्ये अनेक वेळा दोघे एकत्र दिसतात.डेविड धवन यांनी एशियन एजशी बोलताना सांगितले की, मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की त्याला लग्न करताना मला पहायचे आहे. मात्र तुम्हाला काय वाटते की तो माझे ऐकेलय तो कधीही येईल आणि लग्नाची घोषणा करेल.मला व माझ्या पत्नीला तात्काळ लग्नाची तयारी करावी लागेल. कौतुकास्पद बाब आहे की यापूर्वीदेखील डेविड धवन मुलगा वरूण धवनच्या निर्णयामुळे खूप खूश आहेत.