​करण जोहरच्या घरी एकत्र का आलेत वरूण धवन अन् सिद्धार्थ मल्होत्रा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 10:48 IST2017-03-30T05:18:18+5:302017-03-30T10:48:18+5:30

बॉलिवूड दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने सरोगसीद्वारे एकल पालकत्व स्वीकारले आणि काल बुधवारी तो रूही व यश या आपल्या ...

Varun Dhawan and Siddharth Malhotra come together in Karan Johar's house? | ​करण जोहरच्या घरी एकत्र का आलेत वरूण धवन अन् सिद्धार्थ मल्होत्रा?

​करण जोहरच्या घरी एकत्र का आलेत वरूण धवन अन् सिद्धार्थ मल्होत्रा?

लिवूड दिग्दर्शक व निर्माता करण जोहरने सरोगसीद्वारे एकल पालकत्व स्वीकारले आणि काल बुधवारी तो रूही व यश या आपल्या जुळ्या मुलांना रुग्णालयातून घरी घेऊन आला.  रूही व यश हे दोघेही घरी आल्या-आल्या या दोघांना कोण भेटायला आले असेल? जरा गेस करू शकता? तर सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरूण धवन. (करणच्या दोन्ही चिमुकल्यांची एक झलक पाहण्यासाठी आपणच नाही तर बॉलिवूडही उत्सूक आहे, हेच यावरून दिसतेय.) अर्थात सिद्धार्थ व वरूण दोघेही एकत्र नाही तर वेगवेगळ्या कारमधून करणच्या घरी पोहोचले.  पण काय फरक पडतो? कारण, एका कारमध्ये आले नसले तरी दोघेही एकाच घरात गेलेत, हे महत्त्वाचे.





हे आम्ही यासाठी बोलतोय, कारण सध्या सिद्धार्थ व वरूण यांच्यात फार काही आॅलवेल नाहीय. पार्टी असो वा कुठला इव्हेंट अलीकडे वरूण व सिद्धार्थ दोघेही एकमेकांना टाळतानाच अधिक दिसतात. त्यामुळेच काल रात्री हे दोघे करणच्या घरी एकत्र दिसल्याने सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या. आता वरूण व सिद्धार्थ दोघेही करणच्या लाडक्या शिष्यांपैकी आहेत, हे सांगायला नकोच. त्यामुळे त्यांना करणच्या घरी येण्यासाठी कुठल्याही निमित्ताची गरज नाही. पण त्यांचे असे एकत्र करणच्या घरी येणे, योगायोग मात्र नक्कीच असू शकत नाही. रूही व यश यांची भेट हे जरी निमित्त असले तरी आणखी एक वेगळे कारणही यामागे असू शकते. कदाचित वरूण व सिद्धार्थ या दोघांत दिलजमाईचे तर हे प्रयत्न नाहीत? अर्थात असे असेल तर सगळ्यांनाच आनंद आहे. होय ना??

 

Web Title: Varun Dhawan and Siddharth Malhotra come together in Karan Johar's house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.