वरुण धवन आणि नताशा दलालचे झाले ब्रेकअप ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 10:13 IST2017-11-01T04:43:55+5:302017-11-01T10:13:55+5:30

वरूण धवन आणि नताशा दलाल आपल्या नात्याला घेऊन नेहमीच चर्चेत राहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये खटके उडाल्याच्या बातम्यासमोर ...

Varun Dhawan and Natasha Broke Breakup? | वरुण धवन आणि नताशा दलालचे झाले ब्रेकअप ?

वरुण धवन आणि नताशा दलालचे झाले ब्रेकअप ?

ूण धवन आणि नताशा दलाल आपल्या नात्याला घेऊन नेहमीच चर्चेत राहिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांमध्ये खटके उडाल्याच्या बातम्यासमोर येत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार वरूण आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा नात्यामध्ये दुरावा आल्याचे कळते आहे. काही दिवसांपासून ते एकमेकांना भेटत नाही आहेत. त्यांना शेवटचे एकत्र चित्रपट 'जुडवा२' च्या स्पेशल स्क्रिनिंगच्यावेळी एकत्र पाहण्यात आले होते. त्यानंतर ते एकत्र कुठेच दिसले नाही. दिवाळीच्या पार्टीमध्ये सुद्धा वरूण एकटाच होता. खरंतर वरून नेहमीच प्रत्येक कार्यक्रमात नताशाबरोबर दिसतो पण गेल्या काही दिवसांपासून तो एकटाच सगळीकडे दिसतोय.

यावरून हे कळते की वरूण आणि नताशाचे आपसात पटत नाही आहे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. वरुण धवन चित्रपट 'जुडवा२'च्या यशानंतर त्याच्या बाकी चित्रपटाच्या कामात व्यस्त झाला आहे. एकामागोमाग एक हिट चित्रपट देत वरुण यशाचे शिखर गाठत आहे. वरुण धवन सध्या आपल्या कामात आणि त्याच्या आगामी चित्रपटावर जास्त लक्षकेंद्रित करतो आहे. त्याच्याकडे दुसऱ्या कोणत्याच गोष्टीसाठी वेळ नाही आहे. ह्याच कारणामुळे कदाचित वरूण आणि नताशा एकमेकांपासून हळूहळू दूर जातायेत. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरुण धवनकडे नताशासाठी वेळ नाही आहे. ते कित्येक दिवस एकमेकांना भेटत नाही आहेत ना एकमेकांशी बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्यात सारखे वाद होतयेत. काही दिवसांपूर्वी अशी खबर होती की वरुण आणि नताशा लवकरच आपल्या नात्याला एक नवीन नाव देणार आहेत पण त्याच्या नात्यातील दुराव्याचा बातमी ने त्यांच्या चाहते ना निराश करण्यासारखे आहे. 

ALSO READ :  ​वरूण धवनवर नाराज तर नाही गर्लफ्रेन्ड नताशा दलाल? बी-टाऊनमध्ये चर्चेला उधाण


'किक २'मध्ये सलमानसोबत वरुण असणार आहे.साजिद नाडीयादवालाने 'किक २' बद्दल दोघांशी बोलणी सुद्धा सुरु केली आहे आणि दोघांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. सूत्रानुसार  साजिदची टीम सध्या 'किक २' स्क्रिप्टवर काम करत आहे.दोघांची केमिस्ट्री चित्रपटात पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील. 

Web Title: Varun Dhawan and Natasha Broke Breakup?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.