आता येणार वरुण-आलियाचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 06:06 IST2016-03-08T13:06:27+5:302016-03-08T06:06:27+5:30
बॉलिवूडचा चॉकलेटी हिरो वरुण धवन आणि चुलबुली गर्ल आलिया भट्ट यांची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर एकत्र येऊ ...
.jpg)
आता येणार वरुण-आलियाचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’!!
ब लिवूडचा चॉकलेटी हिरो वरुण धवन आणि चुलबुली गर्ल आलिया भट्ट यांची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर एकत्र येऊ शकते. सन २०१२ मध्ये आलेल्या ‘स्टुडंट आॅफ दी ईयर’मधून सर्वप्रथम ही जोडी प्रेक्षकांसमोर आली होती. यानंतर २०१४ मध्ये प्रदर्शित ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्येही ही जोडी सुपरहिट ठरली. ‘हम्प्टी शर्मा...’च्या यशानंतर दिग्दर्शक शशांक खेतान ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. यातही वरूण-आलिया एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये आलिया व वरूण या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. त्यामुळे पुन्हा या जोडीला घेण्याचा निर्णय शशांक खेतान यांनी घेतला आहे. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ हा चित्रपट पंजाब व दिल्ली बेस्ड होता. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ उत्तर प्रदेशावर केंद्रीत असेल. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याचे चित्रीकरण सुरु होणे अपेक्षित आहे.