Valentine's Day Special : बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने शेअर केला नवऱ्यासोबत लिपलॉक करतानाचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 18:04 IST2020-02-14T18:03:08+5:302020-02-14T18:04:23+5:30
व्हॅलेंटाइन्स डेला अभिनेत्रीनं शेअर केला लिपलॉकचा फोटो

Valentine's Day Special : बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने शेअर केला नवऱ्यासोबत लिपलॉक करतानाचा फोटो
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने बऱ्याच सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर आपल्या पार्टनरबद्दल असलेलं प्रेम जाहीर केलं. या सेलेब्सच्या यादीत बॉलिवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूरचाही समावेश आहे. तिने इंस्टाग्रामवर नवरा आनंद आहुजासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते दोघे पॅरिसमधील एफिल टॉवरखाली उभे राहून लिपलॉक करताना दिसत आहेत.
सोनम कपूरने व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देत इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. २०१६ ला सोनम आणि आनंद आहुजा रिलेशनशीपमध्ये होते. त्यावेळी त्यांनी हा फोटो काढला होता. सोनमच्या या फोटोला चाहत्यांकडून खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. सोनम आणि आनंदची केमिस्ट्री चाहत्यांना नेहमीच आवडत असते. त्यामुळे त्यांच्या फोटोला नेहमीच अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात.
८ मे २०१८ ला सोनम आणि आनंद आहुजा लग्नबेडीत अडकले. त्यानंतर सोनम अभिनय क्षेत्रापासून थोडी लांब जरी असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
ती तिच्या चाहत्यांना अपडेट्स देत असते. हा फोटो जरी जुना असला तरी चाहत्यांसाठी सोनम आणि आनंदचा रोमँटिक अंदाज भावतो आहे.