अखेर उर्वशी रौतेलाला मिळाले ‘काम’!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 04:13 PM2019-01-13T16:13:00+5:302019-01-13T16:14:06+5:30

उर्वशी रौतेला अनेक दिवसांपासून कामाच्या शोधात होती. पण उर्वशीच्या हाताला काम नव्हते. मग काय, सोशल मीडियावर स्वत:चे हॉट फोटो शेअर करण्याचा सपाटा तिने लावला होता. किमान यामुळे तरी आपण चर्चेत राहू, असा तिचा प्रयत्न होता. पण आता उर्वशीच्या झोळीत एक मोठ्ठा चित्रपट पडलाय.

urvashi rautela to star in john abraham upcoming film pagalpanti | अखेर उर्वशी रौतेलाला मिळाले ‘काम’!

अखेर उर्वशी रौतेलाला मिळाले ‘काम’!

googlenewsNext
ठळक मुद्दे२०११ मध्ये उर्वशीने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला.

उर्वशी रौतेला अनेक दिवसांपासून कामाच्या शोधात होती. पण उर्वशीच्या हाताला काम नव्हते. मग काय, सोशल मीडियावर स्वत:चे हॉट फोटो शेअर करण्याचा सपाटा तिने लावला होता. किमान यामुळे तरी आपण चर्चेत राहू, असा तिचा प्रयत्न होता. पण आता उर्वशीच्या झोळीत एक मोठ्ठा चित्रपट पडलाय. होय, ताजी बातमी खरी मानाल तर जॉन अब्राहमच्या ‘पागलपंती’ या आगामी कॉमेडी सिनेमात उर्वशीची वर्णी लागली आहे. अर्थात अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. पण उर्वशीने मात्र या चित्रपटासाठी तयारी सुरु केल्याचेही कळतेय. आपल्या डायलॉग डिलीवरीवर ती काम करत आहे.


अनीस बाज्मी हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. उर्वशी या चित्रपटात दिसली तर अनीस बाज्मीसोबतचा तिचा हा पहिला चित्रपट असेल. ‘पागलपंती’ या चित्रपटात जॉन अब्राहमशिवाय अनिल कपूर, इलियाना डिक्रुज, पुलकित सम्राट, कृती खरबंदा आणि अर्शद वारसीसारखे कलाकार दिसणार आहे.

चित्रपटात जॉन अब्राहम इलियाना डिक्रूजसोबत तर पुलकित सम्राट कृती खरबंदासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. तूर्तास उर्वशीची चित्रपटात काय भूमिका असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.


२०११ मध्ये उर्वशीने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. यानंतर ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती.

Web Title: urvashi rautela to star in john abraham upcoming film pagalpanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.