पडली असती तर मज्जा आली असती...! उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 17:30 IST2018-08-19T17:28:28+5:302018-08-19T17:30:46+5:30
‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे. उर्वशीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे .

पडली असती तर मज्जा आली असती...! उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर अशीही प्रतिक्रिया!!
‘हेट स्टोरी4’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना रिझवणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह आहे. उर्वशीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे आणि हा व्हिडिओ चांगलाच हिट झाला आहे. आत्तापर्यंत ४ लाखांवर लोकांनी हा व्हिडिओ पाहिला. अर्थात अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उर्वशीला ट्रोलही केले.
या व्हिडिओत उर्वशी वेगवेगळ्या पोज देता दिसतेय. पण पोज देता देता अचानक तिचे संतुलन बिघडते आणि ती पडता पडता वाचते. यानंतर उर्वशी स्वत:चं हसत सुटते. व्हिडिओत उर्वशीने हाय हिल्स घातलेल्या आहेत. याच हाय हिल्समुळे तिचे संतुलन बिघडलेले दिसतेय. उर्वशीने गंमत म्हणून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. कदाचित यावरून आपण ट्रोल होऊ असे, तिलाही वाटले नसावे. पण नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आणि हे सगळे ‘नौटंकी’ असल्याचे म्हटले. पडली असती तर मज्जा आली असते, असेही अनेकांनी म्हटले.
२०११ मध्ये उर्वशीने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’,‘सनम रे’ अशा चित्रपटात ती दिसली. यानंतर ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ हा चित्रपट तिच्या झोळीत पडला.