उर्मिलाही विवाहबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 09:22 IST2016-03-03T16:17:17+5:302016-03-03T09:22:33+5:30
‘रंगीला’,‘सत्या’, ‘भूत’,‘प्यार तुने क्या किया’ आदी चित्रपटात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी आपली लाडकी उर्मिला अर्थात उर्मिला मातोंडकर ही अखेर ...
.jpg)
उर्मिलाही विवाहबंधनात
‘ ंगीला’,‘सत्या’, ‘भूत’,‘प्यार तुने क्या किया’ आदी चित्रपटात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणारी आपली लाडकी उर्मिला अर्थात उर्मिला मातोंडकर ही अखेर लग्नगाठीत अडकलीच. प्रिती झिंटा पाठोपाठ उर्मिलाने काश्मिरी उद्योगपती व मॉडेल मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत आज गुरुवारी संध्याकाळी लग्नगाठ बांधली. अतिशय साध्या आणि खासगी पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी उर्मिलाचा खास मित्र आणि ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा तेवढा उपस्थित होता. हा आमच्यासाठी अतिशय खासगी सोहळा होता. त्यामुळे केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र यांच्यासोबत आम्ही तो साजरा केला, असे उर्मिलाने विवाहानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.