Udit Narayan : उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका? मॅनेजरने सांगितलं व्हायरल मेसेजमागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 14:59 IST2022-10-06T14:55:41+5:302022-10-06T14:59:39+5:30
सोशल मीडियावर udit narayan heart attack हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

Udit Narayan : उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका? मॅनेजरने सांगितलं व्हायरल मेसेजमागचं सत्य
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली. आहे. ही बातम्या पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चिंता वाटू लागली. पण उदित नारायण यांना खरोखरच हृदयविकाराचा झटका आला आहे का? किंवा ही केवळ अफवा आहे, आम्ही तुम्हाला सांगतो या व्हायरल होत असलेल्या बातमी मागचे सत्य.
अजिबात काळजी करण्याची गरज नाही, उदित नारायण यांना हृदयविकाराच्या झटक्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यांच्या मॅनेजरने या अफवांना पूर्णविराम लावला. उदित नारायण यांच्या मॅनेजरने सांगितले की त्यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे आणि त्यांना काहीही झालेले नाही. या अफवांना पूर्णविराम देत मॅनेजर म्हणाला, अशा बातम्या कुठून व्हायरल होत आहेत हे मला माहीत नाही. त्याला सतत कॉल येत आहेत आणि ट्विटरवर अनेक बातम्या चालू आहेत, त्यानंतर त्यांनी उदित नारायण यांच्याशी चर्चा केली.
मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, या अफवा नेपाळमधून पसरवल्या जात असल्याचं त्याला वाटतं. कारण ज्या क्रमांकावरून हा संदेश पाठवला जात आहे तो नेपाळचा कोड नंबर आहे.