सनी लिओनीसाठी एकाचवेळी आल्यात दोन वाईट बातम्या! तुम्हीही वाचा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 14:06 IST2017-12-08T08:36:54+5:302017-12-08T14:06:54+5:30
सनी लिओनी गत पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे. पॉर्न स्टार ते एक बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनीला स्वत:ची इमेज ...

सनी लिओनीसाठी एकाचवेळी आल्यात दोन वाईट बातम्या! तुम्हीही वाचा!!
स ी लिओनी गत पाच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे. पॉर्न स्टार ते एक बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणा-या सनीला स्वत:ची इमेज बदलायची होती. बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यामागे तिचा हा एकमेव उद्देश होता. पण इतक्या वर्षांत इमेज बदलण्यात सनीला म्हणावे तसे यश आले नाही. सनीने प्रत्येकवेळी ‘पोर्न स्टार’ हा शिक्का मिटवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी हा शिक्का मिटण्याऐवजी या पूर्वाश्रमीच्या ‘इमेज’नुसार अतिशय बोल्ड भूमिकाच तिच्या वाट्याला आल्यात. अर्थात यामुळे सनीला फार फरक पडला नाही. पण कदाचित दोन ताज्या बातम्यांमुळे सनीला फरक पडणार, हे नक्की.
होय, पहिली बातमी तिच्या बेंगळुरूमधील ३१ डिसेंबरच्या नियोजित कार्यक्रमाबद्दल आहे. सनीने या कार्यक्रमासाठी बरीच तयारी केली होती. पण आता तिचा हा कार्यक्रम रद्द होण्याच्या बेतात आहे. होय, कर्नाटक रक्षण वेदिके या कन्नड संघटनेने या कार्यक्रमाविरोधात मोर्चा काढल्याने हा कार्यक्रम वादात सापडला आहे. सनीचे असले जाहिर कार्यक्रम भारतीय संस्कृतीवर ‘हल्ला’ असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. या संघटनेने सनीच्या प्रतिमांचे दहन करत तिच्या बेंगळुरूमधील कार्यक्रमास विरोध केला. बेंगळुरुमधील एका मोठ्या हॉटेलात सनीच्या या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे तिकिट केवळ काही निवडक आयटी कंपन्यांना विकल्या जात आहे, असेही कळते.
ALSO READ : सनी लिओनीने बॉलिवूडला केला बाय-बाय; इमेज बदलण्यासाठी निवडला ‘हा’ मार्ग!
सनीसाठी आणखीही एक दुसरी वाईट बातमी आहे. ती म्हणजे, ‘The Advertising Standards Council of India’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका सनीला बसणार आहे. कंडोमच्या जाहिराती केवळ रात्री प्रसारित करण्याचा हा निर्णय आहे. सनीच्या कंडोम जाहिरातींना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कौन्सिलने हा निर्णय घेतला आहे. एकंदर काय तर सनीसाठी या वर्षाचा शेवट फार समाधानकारक नाही, असेच म्हणावे लागेल. अलीकडे सनीचा ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट रिलीज झाला. पण बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट दणकून आपटला.