एका अफवेनं बर्बाद केलं ‘तुम से अच्छा कौन है’ फेम नकुल कपूरचं करिअर.., तो सध्या काय करतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 08:00 AM2023-03-16T08:00:00+5:302023-03-16T08:00:02+5:30

Nakul Kapoor : ‘तुम से अच्छा कौन है’ रिलीज झाला आणि नकुल एका रात्रीत स्टार झाला. या चित्रपटातील गाणी इतकी गाजली की, नकुल स्टार लाखो तरूणींच्या ‘दिलाची धडकन’ बनला.

tumse achcha kaun hai actor nakul kapoor know about him | एका अफवेनं बर्बाद केलं ‘तुम से अच्छा कौन है’ फेम नकुल कपूरचं करिअर.., तो सध्या काय करतो?

एका अफवेनं बर्बाद केलं ‘तुम से अच्छा कौन है’ फेम नकुल कपूरचं करिअर.., तो सध्या काय करतो?

googlenewsNext

साल होतं २००२... बॉलिवूडमध्ये एक हँडसम मुलगा आपलं नशीब आजमावत होता. त्याचं नाव होतं, नकुल कपूर(Nakul Kapur). पठ्ठयाचं नशीब तेव्हा जोरावर होतं, असंच म्हणायला हवं. कारण यावर्षी आलेला त्याचा सिनेमा सुपरडुपर हिट झाला. नकुल एका रात्रीत स्टार झाला. पण मग अचानक असं काही झालं की, नकुल एका रात्रीत स्टार झाला तसा एका रात्रीत इंडस्ट्रीतून गायब झाला. नकुलने १९९८ साली आलेल्या ‘हो गई है मोहब्बत तुमसे’ या अल्बममधून आपल्या करिअरची सुरूवात केली होती. २००१ साली त्याचा ‘आजा मेरे यार’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. पण २००२ मध्ये ‘तुम से अच्छा कौन है’ (Tumse Achcha Kaun Hai) या चित्रपटाने त्याला पहिल्यांदा यशाची चव चाखता आली.

‘तुम से अच्छा कौन है’ रिलीज झाला, तसा त्याच्या सुंदर चेहऱ्याने तरूणींना भुरळही घातली. तो एका रात्रीत स्टार झाला. पेज ३ पार्ट्यांमध्ये त्याच्या चर्चा होऊ लागल्या. नकुल बॉलिवूडचा पुढचा सुपरस्टार होऊ शकतो, अगदी असंही म्हटलं गेलं. अगदी तो बॉलिवूडच्या तिन्ही खानांना टक्कर देऊ शकतो, असंही अनेकजण बोलू लागलेत. पण याचदरम्यान नकुल इंडस्ट्रीतून अचानक गायब झाला. ‘तुम से अच्छा कौन है’नंतर नकुलचा दुसरा चित्रपट आलाचं नाही. नकुल असा अचानक कुठे गायब झाला, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. तो कुठे आहे, काय करतो, याची कोणालाच खबर नव्हती. त्याच्यावर प्रेम करणारे चाहते होते, त्यांनी इंटरनेटवर नकुलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण नकुलचा काहीच पत्ता लागेला.

यानंतर अचानक एक दिवस नकुलच्या मृत्यूचीच बातमी पसरली. आजारपणामुळे नकुलचं निधन झाल्याचा दावा या बातमीत केला गेला होता. ही बातमी नकुलच्या कानावर गेली आणि अचानक नकुल जगासमोर आला. मी जिवंत आहे, असं त्यानं सांगितलं. 

पण मग नकुल असा अचानक इंडस्ट्रीतून गायब का झाला? हा प्रश्न अनुत्तरीत होताच. काही मीडिया रिपोर्टनुसार, नकुल पूर्वीपासून फार आध्यात्मिक वृत्तीचा होता. पहिला हिट मिळाल्यावर अचानक तो अध्यात्माकडे वळला आणि भारत सोडून कॅनडात स्थायिक झाला. तिथे त्याने डिवाइन लाईफ नावाचं योगा सेंटर उघडलं. सध्या तो इथेच लोकांना योगा शिकवतो.  आता तर नकुल पूर्णपणे लोकांच्या विस्मृतीत गेलायं. बॉलिवूडवर मनापासून प्रेम करणारे चाहतेही त्याला विसरले आहेत. 
 

Web Title: tumse achcha kaun hai actor nakul kapoor know about him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.