हिला ओळखलंत का ? 20 वर्षांत इतकी बदलली 'तुम बिन'ची अभिनेत्री, आज आहे कोट्यवधीची मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 01:22 PM2021-05-24T13:22:27+5:302021-05-24T13:29:42+5:30

तिच्या सौंदर्यामुळे खूपच कमी कालावधीत ती एक प्रसिद्ध मॉडेल बनली.

Tum bin actress sandali sinha was away from films now founder and owner of a bakery | हिला ओळखलंत का ? 20 वर्षांत इतकी बदलली 'तुम बिन'ची अभिनेत्री, आज आहे कोट्यवधीची मालकीण

हिला ओळखलंत का ? 20 वर्षांत इतकी बदलली 'तुम बिन'ची अभिनेत्री, आज आहे कोट्यवधीची मालकीण

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आल्या आहेत ज्या एक रात्रीत हिट देऊन स्टार झाल्या पण त्यानंतर बी-टाऊनमधून गायब झाल्या. आज आपण अशाच एका सुंदर नायिकेबद्दल बोलणार आहोत, जी तिच्या पहिल्याच चित्रपटातून हिट ठरली. आम्ही बोलतोय 'तुम बिन' सिनेमातील  अभिनेत्री संदाली सिन्हाबद्दल. 'तुम बिन' हा चित्रपट २००१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाची कथा, व्यक्तिरेखा सगळेच प्रेक्षकांना भावले होते. विशेष म्हणजे या चित्रपटातील सगळीच गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या चित्रपटात संदली सिन्हाला आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. हा चित्रपट तिचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटानंतर ती बॉलिवूडमधील एक हिट अभिनेत्री बनेल असे अनेकांना वाटले होते. पण या चित्रपटानंतर ती केवळ पिंजर, ओम, अब तुम्हारे हवाले वतन साथियो यांसारख्या काहीच चित्रपटांमध्ये झळकली. तिला बॉलिवूडमध्ये म्हणावे तसे यश न मिळाल्याने ती अभिनयक्षेत्रापासून दूर गेली.


संदली सिन्हाचे वडील एअर फोर्समध्ये होते. पण देशाची सेवा करत असताना त्यांचे निधन झाले. तिच्या आईनेच तिला आणि तिच्या भावंडांना लहानाचे मोठे केले. संदली लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. त्यामुळे तिला डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण तिने एका फॅशन शोमध्ये काम केले आणि ती मॉडलिंगकडे वळली.

मॉडलिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी संदलीने मुंबईतच स्थायिक व्हायचे ठरवले. तिच्या सौंदर्यामुळे खूपच कमी कालावधीत ती एक प्रसिद्ध मॉडेल बनली. मॉडलिंग करत असतानाच सोनू निगमच्या दिवाना या अल्बममध्ये तिला झळकण्याची संधी मिळाली. या अल्बमचे दिग्दर्शन अनुभव सिन्हाने केले होते. त्याच अल्बममुळे अनुभव सिन्हाने दिग्दर्शित केलेल्या तुम बिन या चित्रपटात त्याने मुख्य भूमिकेसाठी तिची निवड केली.

संदली बॉलिवूडपासून दूर तिच्या खाजगी आयुष्यात सध्या प्रचंड खूश आहे. २००५ साली तिने बिझनेसमन किरण साळस्करसह लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली. झगमगत्या दुनियेपासून लांब जात सध्या ती आपल्या कुटुंबासह आयुष्य एन्जॉय करत आहे. संदलीला दोन मुलंही आहेत. सिनेमात झळकत नसली तरी संदली कोट्यावधीची मालकीण आहे. ‘कंट्री ऑफ ओरिजिन’ ही देशातील सर्वात मोठी बेकरी असून या बेकरीची ती मालकीण आहे. ती आता फक्त बिझनेसवरच लक्ष केंद्रित करत आहे.

Web Title: Tum bin actress sandali sinha was away from films now founder and owner of a bakery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.