Tubelight : ओमपुरींच्या आठवणी सांगताना भावुक झाला सलमान खान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 19:19 IST2017-05-25T13:49:15+5:302017-05-25T19:19:15+5:30
आज सलमान खानच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात येणार असून, त्याच्या चाहत्यांमध्ये याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली ...

Tubelight : ओमपुरींच्या आठवणी सांगताना भावुक झाला सलमान खान!
आ सलमान खानच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात येणार असून, त्याच्या चाहत्यांमध्ये याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. आज रात्री ९ वाजता ट्रेलर लॉन्च केले जाणार असून, मीडियासोबत प्री-ट्रेलर लॉन्चिंग इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सलमानसह, सोहेल खान, प्रीतम आणि दिग्दर्शक कबीर खान उपस्थित होते. मीडियाशी बोलताना सलमानने चित्रपटाशी संबंधित काही आठवणी सांगितल्या. यावेळी त्याने चित्रपटातील त्याचे को-स्टार दिवंगत अभिनेते ओमपुरी यांच्या आठवणी सांगितल्या. सलमानने म्हटले की, ‘ओमपुरीसारखा दुसरा अभिनेता होणे शक्य नाही’ यावेळी तो खूपच भावुक झाल्याचे दिसून आले.
पुढे बोलताना सलमानने म्हटले की, ‘जेव्हा मी ओमपुरीला ट्रेलर किंवा टीजरमध्ये बघत असतो तेव्हा मला त्यांची खूप आठवण येते. मी त्यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ट्रेलरमध्ये त्यांची झलक बघायला मिळते अन् लगेचच दुसºया क्षणी ते दिसनासे होतात’ असेही सलमानने सांगितले. सलमनाने त्याच्या ‘रेडिओ’ या गाण्याच्या लॉन्चिंगप्रसंगीही ट्रेलरविषयी सांगितले होते. ‘मला असे वाटत होते की, रेमोने मला जे सांगितले, त्याच स्टेप मी करत होतो. वास्तविक रेमोने मला दुसरेच दाखविले होते, परंतु गाण्यात मी भलताच डान्स केला.’ मीडियाने जेव्हा सलमानला त्याच्या कॅरेक्टरविषयी विचारले तेव्हा त्याने ‘आपण जसे कपडे घालत असतो, तसाच मी या कॅरेक्टरमध्ये घुसलो.’
![]()
सलमानचा हा चित्रपट १९६२ मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धाच्या प्रसंगावर आधारित आहे. ज्यामध्ये सलमान खूपच साधाभोळा व्यक्ती दाखविण्यात आला आहे. चित्रपटात सोहेल खानने त्याच्या भावाची भूमिका साकारली आहे. या दोघांव्यतिरिक्त चिनी अभिनेत्री जू जू हिचीही महत्त्वाची भूमिका आहे. या इव्हेंट लॉन्चिंगसाठी ती उपस्थित राहणार होती, परंतु काही कारणास्तव तिला उपस्थित राहता आले नाही. दरम्यान, या चित्रपटाविषयी सलमानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, आतापर्यंत चित्रपटासंबंधित समोर आलेल्या सर्व घडामोडींना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.