Trolled : ​प्रियांका चोप्रा, आता तुझ्या चेह-यावर वय दिसू लागलेयं...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 10:23 IST2017-10-05T04:53:50+5:302017-10-05T10:23:50+5:30

दोन दिवसांआधी प्रियांकाने स्वत:चा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. पण हा फोटो शेअर केल्यामुळे तिला ट्रोल व्हावे लागले.

Trolled: Priyanka Chopra, now your face has appeared in the age ...! | Trolled : ​प्रियांका चोप्रा, आता तुझ्या चेह-यावर वय दिसू लागलेयं...!

Trolled : ​प्रियांका चोप्रा, आता तुझ्या चेह-यावर वय दिसू लागलेयं...!

शल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींना ट्रोल करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढते आहे. रोज नवी सेलिब्रिटी या ट्रोलिंगची शिकार ठरताना दिसतेय. ताजे उदाहरण म्हणजे प्रियांका चोप्रा.
दोन दिवसांआधी प्रियांकाने स्वत:चा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. पण हा फोटो शेअर केल्यामुळे तिला ट्रोल व्हावे लागले.  ‘मंडे मोटिव्हेशन’ असे कॅप्शन देत प्रियांकाने हा फोटो पोस्ट केला आणि काहीच वेळात युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले. काही ट्रोलर्सनी वाढत्या वयावरून तिची खिल्ली उडवली तर काहींनी तिच्या मेकअपवरून टर उडवली. ‘प्रियांकाचा चेहरा कोमेजलाय’, असे एकाने  ‘किती हा मेकअप’ असे म्हणत प्रियांकावर टीका केली. ‘प्रियांका, तुझा मेकअप चुकीचा आहे. लिपस्टिक लावण्याची पद्धत चुकलीय,’असे एकाने लिहिले. तर ‘चेह-यावर वयाचा परिणाम जाणवू लागला आहे,’ असे दुस-याने लिहिले.







प्रियांकाने अर्थातच या कमेंटवर काहीही उत्तर दिले नाही. कदाचित असल्या कमेंटची प्रियांकाला बहुधा सवय झाली असावी. कारण ट्रोल होण्याची ही तिची पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा ती ट्रोलिंगची बळी ठरली आहे.

ALSO READ : ​ प्रियांका चोप्रा बनली जगातील ८ व्या क्रमांकाची सर्वाधिक कमाई करणारी टीव्ही अभिनेत्री!

मध्यंतरी, आपल्या प्रॉडक्शन हाऊसच्या ‘पहुना’ या सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये  सिक्कीम हे दहशतवादाने पोळलेले राज्य आहे, असे प्रियांका बोलून गेली होती. यावरून युजर्सनी तिला धारेवर धरले होते. ‘मी प्रियांकाच्या या बोलण्याची निंदा करतो. सिक्कीम भारताचे सर्वाधिक शांतीप्रिय राज्य आहे. तुला लाज वाटायला हवी’, अशा शब्दांत युजर्सनी प्रियांकावर हल्ला चढवला होता. त्यापूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ प्रियांकाने शेअर केला होता. यात ती व्हाईट स्पॅगिटी, जीन्स आणि गळ्यात तिरंगा स्कार्फ अशा वेषात दिसली होती. केशरी, पांढरा व हिरवा अशा तिरंग्याचे रंग असलेला तिचा हा दुपट्टाच अनेकांना खटकला होता. यावरून ती ट्रोल झाली होती. तत्पूर्वी बर्लिन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही प्रियांकाच्या मनस्तापाचे (?)कारण ठरली होती. या भेटीदरम्यान प्रियांकाने घातलेला  तोकडा ड्रेस वादाचा विषय ठरला होता. यावरून प्रियांका सोशल मीडियावर ट्रोल झाली होती.

Web Title: Trolled: Priyanka Chopra, now your face has appeared in the age ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.