TROLL: ​शत्रुघ्न सिन्हा भलतेच चुकले! शुभेच्छा एकाला, फोटो भलत्याचाच!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 10:29 IST2017-10-24T04:59:13+5:302017-10-24T10:29:13+5:30

सोशल मीडियावर ट्रोल होणे नवी गोष्ट नाही. अनेक सेलिब्रिटी रोज ट्रोलिंगचे शिकार ठरतात. आता या यादीत ज्येष्ठ अभिनेते आणि ...

TROLL: Shatrughan Sinha misses out! Best wishes to the photographer !! | TROLL: ​शत्रुघ्न सिन्हा भलतेच चुकले! शुभेच्छा एकाला, फोटो भलत्याचाच!!

TROLL: ​शत्रुघ्न सिन्हा भलतेच चुकले! शुभेच्छा एकाला, फोटो भलत्याचाच!!

शल मीडियावर ट्रोल होणे नवी गोष्ट नाही. अनेक सेलिब्रिटी रोज ट्रोलिंगचे शिकार ठरतात. आता या यादीत ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांचीही वर्णी लागली आहे. अर्थात त्यांची ‘चूक’ही तशीच आहे. रविवारी शत्रुघ्न सिन्हा यांनी बॉलिवूडच्या एका ज्येष्ठ अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण या शुभेच्छा देताना शत्रुघ्न यांची कोण का जाणो गफलत झाली. म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा एकाला आणि त्यात फोटो भलत्याचाच, असे काहीसे शत्रुघ्न सिन्हा यांनी केले. मग काय? सोशल मीडियावर नेटिजन्सनी त्यांना त्यांची चूक त्यांच्याच पद्धतीने लक्षात आणून दिली.


होय, त्याचे झाले असे की, शत्रुघ्न सिन्हा यांना दिग्गज अभिनेते कादर खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. त्या त्यांनी दिल्याही. ‘महान अभिनेते, मनोरंजक व संवाद लेखक कादर खान यांचे त्यांच्या वाढदिवशी स्मरण होतेय. लव्ह यू, मिस यू अ‍ॅण्ड विश यू आॅन दिस डे,’ असा शुभेच्छा संदेश त्यांनी कादर खान यांच्यासाठी लिहिला. पण या संदेशासोबत शत्रुघ्न यांनी स्वत:चा अमिताभ यांच्यासोबतचा फोटो शेअर केला. ट्रोलर्सला तर यानिमित्ताने आयती संधी मिळाली.



एका युजरने लता मंगेशकरच्या वाढदिवशी अमित शाह यांचे स्मरण करण्यास सांगून शत्रूघ्न यांना लक्ष्य केले.



एका युजरने मोदींचा फोटो पोस्ट करत अभिनेता गोविंदा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एका युजरने तर शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिचा फोटो शेअर करत, त्याखाली ‘आज महान अभिनेत्री रिना रायची आठवण झाली,’ असे कॅप्शन दिले.


ALSO READ: जाणून घ्या शत्रुघ्न सिन्हाच्या जीवनातील 'या' १० गोष्टी

एकंदर काय तर युजर्सनी शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांची चूक त्यांच्याच पद्धतीने लक्षात आणून दिली. सोशल मीडियावर असे हसे झालेले पाहून अखेर शत्रुघ्न सिन्हा यांना सारवासारव करणे भाग पडले. ‘मी आणि अमिताभ दोघांनीही कादर खान यांच्यासोबत काम केले आहे आणि त्यांच्या योगदानासाठी आभारी आहोत,’ असे tweet त्यांनी यानंतर केले. अर्थात तोपर्यंत ट्रोलर्सनी आयती संधी अचूक साधली होती.

Web Title: TROLL: Shatrughan Sinha misses out! Best wishes to the photographer !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.