Trailer release : भारतातील पहिल्या ‘यू मी और घर’ या वेब फिल्मची पाहा झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 14:19 IST2017-02-05T08:49:19+5:302017-02-05T14:19:19+5:30

वेब टॉकीजनिर्मित भारताच्या पहिल्या वेब फिल्मचा ट्रेलर गेल्या शनिवारी रिलिज करण्यात आला आहे. ‘यू मी और घर’ ही पहिली वेब फिल्म आहे, जी वेबसाइटवर रिलिज केली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरमध्ये न जाता घरबसल्या फक्त ६० रुपयांमध्ये इंटरनेटवर ही फिल्म बघता येणार आहे.

Trailer release: India's first look at 'You Me and Ghar' | Trailer release : भारतातील पहिल्या ‘यू मी और घर’ या वेब फिल्मची पाहा झलक

Trailer release : भारतातील पहिल्या ‘यू मी और घर’ या वेब फिल्मची पाहा झलक

ब टॉकीजनिर्मित भारताच्या पहिल्या वेब फिल्मचा ट्रेलर गेल्या शनिवारी रिलिज करण्यात आला आहे. ‘यू मी और घर’ ही पहिली वेब फिल्म आहे, जी वेबसाइटवर रिलिज केली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना थिएटरमध्ये न जाता घरबसल्या फक्त ६० रुपयांमध्ये इंटरनेटवर ही फिल्म बघता येणार आहे.   

फिल्ममध्ये एका कपलची कथा दाखविण्यात आली आहे, जे मुंबईत घर खरेदी करण्याच्या प्रयत्नात असतात. हळूहळू या कपलच्या लक्षात येतेय की, घराचा शोध घेणे केवळ एकमेकांसोबत प्रेम करणे किंवा इएमआय भरण्यापर्यंत मर्यादित नाही. या फिल्ममध्ये ‘प्यार का पंचनामा-२’ या सिनेमातील अभिनेता ओमकार कपूर आणि कपिल शर्माची ‘किस किस को प्यार करू’मधील अभिनेत्री सीमरन कौर मुंडी दिसणार आहेत. 



ही वेब फिल्म १० फेब्रुवारी रोजी रिलिज केली जाणार आहे. फिल्ममध्ये ओमकार हा मिथिलेशची भूमिका साकारत असून, सीमरन चित्रांशी मजूमदारच्या भूमिकेत दिसणार आहे. ९० मिनिटांच्या या फिल्ममध्ये एक गाणेही आहे. ‘तू ही था’ या गाण्याला इंटरनेटवर जबरदस्त पसंत केले जात आहे. त्यामुळे ही फिल्मदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी अपेक्षा वर्तविली जात आहे. 

फिल्ममधील अभिनेता ओमकार कपूर याने बॉलिवूड करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. ‘जुडवा, हीरो नंबर १, जुदाई’ यासारख्या सिनेमांमध्ये तो बाल कलाकाराच्या भूमिकेत बघावयास मिळाला आहे. या व्यतिरिक्त ओमकारने संजय लीला भंसाळी आणि फराह खान यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे, तर सीमरन बॉलिवूडमध्ये नशीब अजमावत आहे. फिल्ममध्ये दोघांचीही केमिस्ट्री बघण्यासारखी असून, प्रेक्षकांना ती कितपत भावतेय हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Trailer release: India's first look at 'You Me and Ghar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.