Trailer OUT : ​पाहा, सैफ अली खानच्या ‘शेफ’चा ट्रेलर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 15:11 IST2017-08-31T09:41:16+5:302017-08-31T15:11:16+5:30

सैफ अली खान याचा ‘शेफ’ हा आगामी लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीस आला आहे. अर्थात नाव शेफ असले तरी खाण्यापेक्षा हा चित्रपट नात्यांवर भाष्य करणारा आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्याही ते लक्षात येईल.

Trailer OUT: Look, Saif Ali Khan's 'Chef' Trailer! | Trailer OUT : ​पाहा, सैफ अली खानच्या ‘शेफ’चा ट्रेलर!

Trailer OUT : ​पाहा, सैफ अली खानच्या ‘शेफ’चा ट्रेलर!

फ अली खान याचा ‘शेफ’ हा आगामी लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीस आला आहे. अर्थात नाव शेफ असले तरी खाण्यापेक्षा हा चित्रपट नात्यांवर भाष्य करणारा आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्याही ते लक्षात येईल. 
चित्रपटाची पार्श्वभूमी केरळची आहे. विदेशात राहणारा एक शेफ अर्थात सैफ अली खान आपल्या मुलासाठी कोचीनला येतो. म्हणजेच यात एका बाप आणि मुलाची  शिवाय एका पती-पत्नीच्या घटस्फोटाची कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे.  एकंदर सांगायचे तर नेहमीपेक्षा एक वेगळा विषय यात आपल्याला पाहायला मिळणार आहे.



ट्रेलरमध्ये सैफ एका तुटक्या फुटक्या फूड ट्रकमध्ये नवा प्राण फुकताना दिसतोय. सैफ अली खानचा हा चित्रपट जॉन फेवरूच्या याच नावाने आलेल्या चित्रपटाचा आॅफिशिअल रिमेक आहे. चित्रपटात सैफ पंजाबी शेफ बनला आहे. ‘तुम चांदनी चौक के रोशन कालरा के आॅनली पुत्तर होकर ऐसे बात नही कर सकते,’ असे तो एका सीनमध्ये म्हणताना दिसतोय.

ALSO READ : का viral होतोय, सैफ अली खान अन् अमृता सिंहचा ‘हा’ इतका जुना फोटो?

या चित्रपटाद्वारे साऊथची अभिनेत्री पद्मप्रिया हिंदी चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणार आहे. पद्मप्रियाने तेलगू चित्रपटांद्वारे फिल्मी करिअर सुरू केले होते. मात्र तामिळ व मल्याळम चित्रपटातही तिने काम केलेय. राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ६ आक्टोबरला रिलीज होतो आहे. (राजा कृष्ण मेनन यांचा  ‘एअरलिफ्ट’ याआधी आपण बघितला आहेच. अक्षय कुमार लीड रोलमध्ये असलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतला होता. ) आधी ‘शेफ’ हा चित्रपट गत १४ जुलैला रिलीज होणार होता. पण याचदिवशी रणबीर कपूर व कॅटरिना कैफचा ‘जग्गा जासूस’ रिलीज होणार असल्याचे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.

Web Title: Trailer OUT: Look, Saif Ali Khan's 'Chef' Trailer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.