मानुषी छिल्लरच्या 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'चा ट्रेलर लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 01:08 PM2024-02-20T13:08:08+5:302024-02-20T13:08:46+5:30

Operation Valentine : मानुषी छिल्लर आणि वरुण तेज त्यांच्या आगामी 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आज २० फेब्रुवारी रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे.

Trailer launch of Manushi Chhillar's 'Operation Valentine' | मानुषी छिल्लरच्या 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'चा ट्रेलर लॉन्च

मानुषी छिल्लरच्या 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'चा ट्रेलर लॉन्च

मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) आणि वरुण तेज (Varun Tej) त्यांच्या आगामी 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' (Operation Valentine) चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आज २० फेब्रुवारी रोजी निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. चित्रपटाचा ट्रेलर खूपच अप्रतिम आहे.

ऑपरेशन व्हॅलेंटाइनच्या ट्रेलरमध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ला कसा झाला हे दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये देशातील ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर आपल्या शहीद वीराचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. ट्रेलरमध्ये वरुण तेज एअरफोर्स पायलट अर्जुन देवच्या भूमिकेत दिसत आहे. मानुषी छिल्लरही अप्रतिम दिसत आहे. भारताने पाहिलेल्या भयंकर हवाई हल्ल्यांपैकी एकाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट दोन भाषांमध्ये येणार आहे. या चित्रपटात अनोख्या गोष्टीसोबत अनोखी प्रेम कहाणी दाखवली जाणार आहे. उच्च-ऑक्टेन ॲक्शन सीक्वेन्सपासून ते असुरक्षिततेच्या हृदयस्पर्शी क्षणांपर्यंत, मानुषी तिच्या पात्रातील गुंतागुंत सहजतेने दाखवून देते प्रत्येक फ्रेमसह प्रेक्षकांना मोहित करते.

 

चित्रपटाच्या ट्रेलर लाँचनंतर मानुषी छिल्लर म्हणते की,"ट्रेलर बघून खूप आनंद झाला प्रेक्षकांचं प्रेम आणि सगळ्यांचा पाठिंबा हे माझ्यासाठी खूप आनंद देणारे आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीम कडून मिळणारा पाठिंबा हा खूप काही देवून जाणारा आहे या चित्रपटासाठी मी स्वतः ही खूप उत्सुक आहे. तेलगू सिनेमातून प्रेक्षकांच मनोरंजन करण्यासाठी खूप उत्साही आहे." 

१ मार्चला सिनेमा येणार भेटीला

ऑपरेशन व्हॅलेंटाइनमधून मानुषी आतापर्यंत न पाहिलेल्या अशा अंदाजात दिसणार आहे. शक्ती प्रताप सिंग दिग्दर्शित आणि सोनी पिक्चर्स, संदीप मुड्डा यांच्या रेनेसान्स पिक्चर्स निर्मित, हा चित्रपट १ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Trailer launch of Manushi Chhillar's 'Operation Valentine'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.