‘टोटल धमाल’ची ‘धमाल’! बनला माधुरी दीक्षितच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 10:37 AM2019-02-27T10:37:47+5:302019-02-27T10:38:30+5:30

माधुरी दीक्षितचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘टोटल धमाल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ‘धमाल’ केलीय. केवळ इतकेच नाही तर हा चित्रपट माधुरीच्या फिल्मी करिअरमधील आत्तापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

total dhamaal becomes highest grosser film of madhuri dixits career |  ‘टोटल धमाल’ची ‘धमाल’! बनला माधुरी दीक्षितच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!!

 ‘टोटल धमाल’ची ‘धमाल’! बनला माधुरी दीक्षितच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट!!

googlenewsNext
ठळक मुद्देदिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या दिग्दर्शनाने सजलेला ‘टोटल धमाल’ या मल्टीस्टारर चित्रपटात माधुरी दीक्षितशिवाय अनिल कपूर, अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी आदी मुख्य भूमिकेत आहेत.

माधुरी दीक्षितचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘टोटल धमाल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ‘धमाल’ केलीय. केवळ इतकेच नाही तर हा चित्रपट माधुरीच्या फिल्मी करिअरमधील आत्तापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आश्चर्य म्हणजे,  ‘टोटल धमाल’ने माधुरीच्या करिअरमधील ‘हम आपके है कौन’ या ऑल  टाईम ब्लॉकबस्टर चित्रपटालाही मागे टाकले आहे. केवळ पाचच दिवसांत ‘टोटल धमाल’ने ८०.७५ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आणि याचसोबत हा चित्रपट माधुरीच्या करिअरमधील ‘हाईएस्ट ग्रोसर’ सिनेमा बनला. 

१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या माधुरी दीक्षित, सलमान खान यांच्या  ‘हम आपके है कौन’ या ऑल टाईम ब्लॉकबस्टर चित्रपटाने ७२.४६ कोटी रूपयांची कमाई केली होती. हा चित्रपट आत्तापर्यंत माधुरीच्या करिअरमधील ‘हाईएस्ट ग्रोसर’ चित्रपटांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. पण आता  ‘हम आपके है कौन’ला पछाडत  ‘टोटल धमाल’ने या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.

२००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान, ऐश्वर्या राय व माधुरी दीक्षित यांचा ‘देवदास’ ‘हाईएस्ट ग्रोसर’ चित्रपटांच्या यादीत  दुस-या क्रमांकावर होता. या चित्रपटाने ४१.६५ कोटींचा बिझनेस केला होता. आता हा चित्रपट तिस-या क्रमांकावर फेकल्या गेला आहे. ‘दिल तो पागल है’ हा माधुरीचा चित्रपटही ‘हाईएस्ट ग्रोसर’ चित्रपटांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर सरकला आहे. या चित्रपटाने ३४.९७ कोटी रूपयांची कमाई केली होती.
दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्या दिग्दर्शनाने सजलेला ‘टोटल धमाल’ या मल्टीस्टारर चित्रपटात माधुरी दीक्षितशिवाय अनिल कपूर, अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी आदी मुख्य भूमिकेत आहेत. येत्या वीकेंडपर्यंत हा चित्रपट १०० कोटींची कमाई करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Web Title: total dhamaal becomes highest grosser film of madhuri dixits career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.