तब्बूला पुणेकरांच्या रोषाचा करावा लागला सामना; शूटिंग पाडले बंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2017 14:12 IST2017-07-01T08:42:47+5:302017-07-01T14:12:47+5:30

काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याच्यासंबंधी वक्तव्य करून चर्चेत आलेल्या अभिनेत्री तब्बू हिला आज वेगळ्याच एका घटनेचा सामना ...

Tobacco faced by the people of Pune; Shooting stopped! | तब्बूला पुणेकरांच्या रोषाचा करावा लागला सामना; शूटिंग पाडले बंद!

तब्बूला पुणेकरांच्या रोषाचा करावा लागला सामना; शूटिंग पाडले बंद!

ही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याच्यासंबंधी वक्तव्य करून चर्चेत आलेल्या अभिनेत्री तब्बू हिला आज वेगळ्याच एका घटनेचा सामना करावा लागला. वास्तविक तब्बू तिच्या आगामी चित्रपटासाठी पुण्याला पोहोचली होती. ठरल्याप्रमाणे खडकी कॅन्टॉमेंट भागात शूटिंगचा सेट उभारण्यात आला. शूटिंगला सुरुवातही करण्यात आली. परंतु यामुळे वाहतुकीला अडथळा येत असल्याने प्रचंड ट्रॅफिक जॅम झाली. अशात काही स्थानिक नागरिकांनी शूटिंगला विरोध करीत शूटिंग बंद करण्याचे सांगितले. विशेष म्हणजे निर्माते आणि दिग्दर्शकांनी चित्रिकरणासाठी कुठल्याही परवानग्या घेतल्या नसल्याने नागरिकांचा रोष प्रचंड वाढला होता. 

सुरुवातीला तब्बू सेटवर पोहोचली होती. दिग्दर्शकांनी केलेल्या सूचनांप्रमाणे तिने शूटिंगला सुरुवातही केली. परंतु जेव्हा नागरिकांचा रोष वाढत गेला, तेव्हा तिने तेथून काढता पाय घेतला. तब्बू लगेचच आपल्या कारमध्ये बसून निघून गेली. तब्बूने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या अविवाहित असण्यामागचा खुलासा केला होता. मी अविवाहित असण्यामागे अजय देवगणच कारणीभूत असल्याचे तिने म्हटले होते. यावेळी तिने त्याच्या आयुष्याविषयी बरेचसे धक्कादायक खुलासेही केले होते. 
 


इंडस्ट्रीमध्ये तब्बूने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय अजूनही ती इंडस्ट्रीत सक्रिय आहे. मात्र तिचा ‘विजयपथ’ हा चित्रपट तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आहे. असो, तब्बूच्या स्टारडमचा विचार केल्यास आजही तिचे अनेक चाहते आहेत. ८० ते ९०च्या दशकात तब्बूच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली होती. १९८० मध्ये आलेल्या ‘बाजार’ या चित्रपटात तब्बूने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. 

Web Title: Tobacco faced by the people of Pune; Shooting stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.