​​चित्रपटांचे अनलकी शीर्षक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:12 IST2016-02-09T02:34:35+5:302016-02-09T08:12:22+5:30

लक-अनलक असा काही प्रकार आहे की नाही, हा तसा कायम वादाचा विषय राहिला आहे. परंतु बॉलिवूडमध्ये आजही अनेक जण ...

Title of the movie title! | ​​चित्रपटांचे अनलकी शीर्षक!

​​चित्रपटांचे अनलकी शीर्षक!


/>
लक-अनलक असा काही प्रकार आहे की नाही, हा तसा कायम वादाचा विषय राहिला आहे. परंतु बॉलिवूडमध्ये आजही अनेक जण यावर विश्वास करीत असतात. चित्रपटाच्या मुहूर्तापासून तर शीर्षकापर्यंत अनेक ठिकाणी याचा प्रत्यय येत असतो. असाच एक प्रकार पुन्हा नव्याने घडला आहे. तिग्मांशु धूलियाचा चित्रपट ‘मिलन टॉकीज’ला बनविण्याचा आतापर्यंत पाच वेळा प्रयत्न झाला. मात्र कोणत्यातरी कारणाने चित्रपटाला अडथळे येत आहेत. याचा दोष आता चित्रपटाच्या शीर्षकाला दिला जात आहे.
या चित्रपटात आधी इमरान खान (आमिरचा भाचा), नंतर  इमरान हाश्मी, नंतर शाहिद कपूर, नंतर सुशांत सिंह राजपूत आणि  त्याही नंतर वरुण धवन आदींच्या नावांची घोषणा झाली.  एकता कपूरची कंपनी बालाजी या चित्रपटाला बनविणार होती. मात्र पाचदा फेरबदल झाल्यानंतरही ते शक्य झाले नाही. आता तर तिग्मांशुने हे शीर्षकच अनलकी असल्याचे सांगून टाकले आहे. हा पहिलाच चित्रपट नाही ज्याच्याबाबतीत असे घडले. ‘टाईम मशीन’ नावाच्या  चित्रपटाला तीनदा बनविण्याचा प्रयत्न झाला. मात्र एकदाही हा चित्रपट तया होऊ शकला नाही.


 प्रकाश मेहरानेही पाच वेळा ‘कायर’ नावाचा चित्रपट बनविण्याची घोषणा केली.  ८० च्या दशकात पहिल्यांदाच मेहरा यांनी अमिताभ बच्चन सोबत हा प्रयत्न केला. पण, ते जमले नाही. नंतर संजय दत्त आणि राजेश खन्ना (ज्यांनी कधी सोबत काम केले नाही) सोबत हेमा मालिनी आणि टीना मुनीमच्या टीम सोबत कायर बनविण्याची  घोषणा करण्यात आली. यानंतर मेहराने मिथून चक्रवर्तीला  ‘कायर’ साठी कास्ट केले. नंतर अक्षय कुमार आणि नंतर जानी राजकुमारचा मुलगा पुरुला लाँच करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यातही यश न आल्याने अखेर चित्रपटाचे शीर्षक ‘बाल ब्रह्मचारी’ केले गेले.


कादर खान यांनी ‘जाहिल’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली. ज्याचे दिग्दर्शन ते स्वत: करणार होते आणि मुख्य भूमिकेत अमिताभ बच्चनला कास्ट करणार होते. बिग बी सोबत ताळमेळ न बसल्यामुळे अखेर कादर खान यांनी काही वर्षानंतर गोविंदा सोबत हा चित्रपट बनविण्याचा प्रयत्न केला. तेही जमले नाही. अखेर हे शीर्षकच अनलकी आहे, असे समजून निर्णय बदण्यात आला.

Web Title: Title of the movie title!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.